लारा दत्ता वापरते Dating App? जाणून घ्या काय आहे सत्य

स्वत: लारा दत्ताने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

lara dutta, news, bollywood news, dating app, rumours, lara dutta on dating app,

‘अंदाज’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणारी अभिनेत्रीने म्हणजे लारा दत्ता. गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीपासून लांब असणाऱ्या लाराने ‘हंड्रेड’ या वेब सीरिजच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. त्यानंतर आता लारा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. या चर्चा लारा डेटींग अॅप वापरत असल्यामुळे सुरु झाल्या होत्या. पण आता तिने यावर वक्तव्य करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

लाराने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती डेटींग अॅप वापरण्याविषयी बोलताना दिसत आहे. ‘कालपासून, माझ्या फीडमध्ये काही मीम्स आणि काही मेसेजचा पूर आला आहे. कोणत्या तरी डेटींग अॅपवर माझे अकाऊंट असल्याचे त्यांनी मला सांगितले. हा मूर्खपण आहे. मी काल पासून मला फोन आणि मेसेज करुन विचारणाऱ्या एक एक व्यक्तीला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी हा व्हिडीओ शेअर करत आहे’ असे लारा बोलताना दिसत आहे.
Video: वांगणीचं जंगल ते रेड लाइट एरिया आणि बरंच काही; ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटाचे पडद्यामागचे रंजक किस्से

पुढे ती म्हणाली, ‘मी कोणतेही डेटींग अॅप वापरत नाहीये. मी कधीच कोणते डेटींग अॅप वापरलेले नाही आणि तुम्हाला दिसत असलेले अकाऊंट माझे नाहीये. माझा कोणत्याही डेटींग अॅपला विरोध नाही. या अॅपच्या माध्यमातून आपण एकमेकांना भेटतो बोलतो. पण सध्या मी कोणत्याही डेटींग अॅपवर नाही. मी फार कमी इन्स्टा लाइव्ह करते पण इथे कनेक्ट झालेल्या सर्वांशी संवाद साधून मला आनंद झाला.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lara dutta reacts to rumours of being on dating app avb