गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाल्याने सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मात्र खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुढील काही दिवस लतादीदींना आयसीयूमध्येच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेले डॉ. प्रतित समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लतादीदी या सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. डॉक्टर त्यांची उत्तम काळजी घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्या तरी सध्या त्या कोणालाही भेटू शकत नाही, असेही डॉ. प्रतित यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.

लता मंगेशकर यांना गेल्या एका आठवड्यापासून जास्त वेळ आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. अद्याप त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या आरोग्याबाबतची सर्व माहिती सार्वजनिक करु नये, अशी विनंती त्यांनी डॉक्टरांना केली आहे, असेही ते म्हणाले.

नोव्हेंबर महिन्यात करोनाची लागण

याआधीही नोव्हेंबर २०१९ मध्ये लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना २८ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.

कोरोनासह न्यूमोनियाशीही झुंज

नवभारत टाईम्स या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डॉ. प्रतित समधानी हे लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहेत. लता मंगेशकर यांना गेल्या शनिवारी रात्री दाखल करण्यात आले होते. त्या कोरोनासह न्यूमोनियाशीही झुंज देत आहेत.

Lata Mangeshkar Health Update : लतादीदी ऑक्सिजन सपोर्टवर, डॉक्टरांसह कुटुंबियांनी दिली प्रकृतीविषयी माहिती

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना भजनसम्राट अनूप जलोटा यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही लताजींशी अनेकदा फोनवर बोलत असतो. मी अनेकदा त्यांच्याशी व्हॉट्सअॅपद्वारे बोलतो. पण आजकाल त्या कोणालाच भेटत नाही. कारण वयोमानानुसार त्यांना लवकर संसर्ग होतो. गेल्यावेळी हॉस्पिटलमधून घरी आल्यापासून त्या त्यांच्या खोलीतच असायच्या. त्या कोणत्याही बाहेरच्या लोकांना भेटलेल्या नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी फोनवरून संपर्कात राहतो. त्यांना आता झालेल्या करोनाबाबत घाबरण्यासारखे काहीही नाही. त्यांना सुरक्षेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर व्यवस्थित उपचार होतील.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lata mangeshkar health update singer will remain in icu under doctors supervision for few days nrp
First published on: 16-01-2022 at 13:47 IST