गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती अशी माहिती मिळत आहे. दरम्यान ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी नुकतंच लता मंगेशकर यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली.

नवभारत टाईम्स या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील डॉ. प्रतित समधानी हे लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत आहेत. गेल्या ३-४ वर्षांपासून लता मंगेशकर जेव्हा जेव्हा आजारी पडतात, तेव्हा त्या उपचारासाठी इथे येतात. करोनाची लागण झाल्याने त्या थोड्या गोंधळल्या आहेत, असे डॉ. प्रतित समाधानी यांनी सांगितले.

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Byju employees lost their jobs
नोटीस पीरियड नाही, पगारही नाही; फक्त एक फोन कॉल अन् बायजूच्या कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली
Recruitment for posts of Police Constables refusal to grant interim stay to order of extra marks to transgender
पोलीस हवालदार पदांसाठी भरती, तृतीयपंथीयांना अतिरिक्त गुण देण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार

तसेच लता मंगेशकर यांची बहीण उषा मंगेशकर यांना याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, “करोनाची लागण झाली असल्याने आम्ही दीदींना भेटायला जाऊ शकत नाही. त्याला पाहण्यासाठी तेथे अनेक डॉक्टर आणि परिचारिका आहेत. मात्र वयोमानानुसार त्यांना एक किंवा दोन दिवस जास्त रुग्णालयात राहावे लागू शकते. त्यामुळे त्यांना लवकर डिस्चार्ज मिळण्यात उशीर होऊ शकतो,” असेही त्यांनी सांगितले.

Corona: लता मंगेशकर यांना करोनाची लागण; आयसीयूमध्ये दाखल

न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लता मंगेशकरांना आरोग्याशी संबंधित असणाऱ्या इतर समस्या आणि वय पाहता त्यांना आयसीयूत ठेवण्यात आलं आहे. डॉक्टर सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी उषा मंगेशकर यांनी त्यांना व्हायरल इंफेक्शन झाल्याचं सांगितलं होतं.

लता मंगेशकर या ९२ वर्षांच्या आहेत. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. शनिवारी रात्रीच त्यांना करोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्या लवकर बरे व्हाव्यात यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहे.