दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमारच्या डॉक्टरांना पोलीस संरक्षण; जाणून घ्या कारण

अभिनेता पुनीत राजकुमारचे २९ ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे निधन झाले.

Late actor Puneeth Rajkumar doctor gets police protection
पुनीत राजकुमार यांचे गेल्या आठवड्यात बेंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले. (फोटो सौजन्य : पुनीत राजकुमार/इन्स्टाग्राम)

अभिनेता पुनीत राजकुमारचे २९ ऑक्टोबर रोजी बंगळुरू येथे निधन झाले. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी पुनीत राजकुमारने जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने पुनीत राजकुमारचे निधन झाले. पुनीत राजकुमारच्या निधनामुळे त्यांचे फॅमिली डॉक्टर असणाऱ्या रमण राव यांच्यावर चाहते त्याचे प्रचंड संतापले असून त्यामुळे त्यांना आता पोलीस संरक्षणही देण्यात आले आहे. रमण राव यांच्याकडून पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आल्यानंतर घराच्या बाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुनीत राजकुमारने मृत्यूपूर्वी त्याचे फॅमिली डॉक्टर रमन राव यांच्याशी संवाद साधला होता. जेव्हा पुनीत रमन राव यांना भेटले तेव्हा डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आता पुनीतच्या चाहत्यांची नाराजी आणि आंदोलन पाहून कर्नाटकातील प्रायव्हेट हॉस्पिटल अँड नर्सिंग होम असोसिएशन (फाना) चिंतेत आहे. फाना चे अध्यक्ष प्रसन्न एचएम यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना विनंती केली की “पुनीत राजकुमारच्या मृत्यूनंतर आरोग्य व्यवस्थेला ज्या प्रकारे दाखवले जात आहेत त्याबद्दल फानाला खूप चिंता आहे. पुनीतच्या मृत्यूमुळे रुग्णालय प्रशासनालाही मोठा धक्का बसला आहे. पण, ते वेगळ्या पद्धतीने दाखवले जात आहे.” यासोबतच ‘मुख्यमंत्र्यांनी निवेदन देऊन आरोग्य विभागाचे मनोबल वाढवावे, अशी विनंतीही प्रसन्ना यांच्याकडून करण्यात आली आहे.

“रमण राव आणि अभिनेत्याच्या उपचाराची जबाबदारी असलेल्या सर्व डॉक्टरांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. मात्र अनेक प्रकारच्या अफवाही पसरत आहेत. पुनीतच्या मृत्यू त्याच्या उपचाराची जबाबदारी असलेल्या लोकांकडून काळजी न घेतल्यानेच झाला असल्याचे सांगितले जात आहे आणि सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मृत व्यक्तीच्या वैद्यकीय आरोग्याविषयी चर्चा करणे वैद्यकीय धोरणांचे उल्लंघन करते,” असेही प्रसन्ना यांनी म्हटले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, डॉ. रमण राव यांच्या घराबाहेर केएसआरपीची पलटण तैनात करण्यात आली असून पोलीस चारही ठिकाणी गस्त घालत आहेत.

“पुनीत पत्नी अश्विनीसोबत त्यांच्या क्लिनिकमध्ये आला होता. त्याला अशक्तपणा जाणवत असल्याचे त्याने सांगितले. हा शब्द मी त्यांच्या तोंडून कधी ऐकला नाही. मी त्यांना तपासले. त्याचा रक्तदाब सामान्य होता. हृदयाचे ठोके स्थिर होते. फुफ्फुस देखील ठीक होते, पण त्याला घाम येत होता, जो व्यायामानंतर सामान्य असल्याचे त्याने सांगितले. त्याने वजन उचलले, बॉक्सिंग केले आणि इतर व्यायाम केले. त्यानंतर मी त्याचा ईसीजी करण्याचा विचार केला. मला ईसीजी अहवालात चढ-उतार दिसले. मी अश्विनीला ताबडतोब विक्रम हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितले,” असे डॉ. रमण राव यांनी म्हटले होते.

यानंतर पुनीत राजकुमारला २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.४० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, नंतर २.३० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Late actor puneeth rajkumar doctor gets police protection abn

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या