वाढदिवशी प्रभास करणार लग्नाची घोषणा?

‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभासच्या लग्नाविषयीसुद्धा बऱ्याच चर्चा ऐकायला मिळत आहे.

प्रभास

‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभासच्या लग्नाविषयीसुद्धा बऱ्याच चर्चा ऐकायला मिळत आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर अभिनेता प्रभासच्या स्टारडममध्ये जी वाढ झाली, ते काही नव्याने सांगायला नको. प्रभासचा लूक आणि त्याची शरीरयष्टी पाहून अनेकजण जणू त्याच्या प्रेमातच पडले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच तो देशभरातील चाहत्यांसाठी जणू ‘मेगास्टार’ बनला आहे. आता हा ‘मेगास्टार’ कधी लग्न करतोय याची प्रतीक्षा चाहत्यांना आहे. पुढील महिन्यांत प्रभासचा वाढदिवस आहे आणि वाढदिवशीच आपल्या लग्नाची बातमी तो चाहत्यांना देऊ शकतो अशा चर्चांना आता उढाण आलं आहे.

‘बाहुबली’च्या सिक्वलनंतर प्रभास त्याची सहकलाकार अनुष्का शर्मा हिच्याशी विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा होती. अनुष्का आणि प्रभास एकमेकांना डेट करत असून हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र त्यानंतर साऊथचा मेगास्टार चिरंजीवी यांची पुतणी निहारिका हिच्यासोबत प्रभास लग्न करणार असल्याचीही चर्चा सुरू झाली. मात्र या दोन्ही चर्चांवर प्रभास मौन बाळगून आहे. पण २३ ऑक्टोबरला प्रभास विवाहाची घोषणा करू शकतो असं म्हटलं जात आहे, त्यामुळे त्यांचे चाहतेही खूप उत्सुक आहेत.

सध्या प्रभास ‘साहो’ या नवीन चित्रपटात व्यग्र आहे. प्रभासव्यतिरिक्त जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, नील नितीन मुकेश हेदेखील ‘साहो’मध्ये खलनायकांची भूमिका रंगवताना दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Latest buzz prabhas to reveal marriage plans on his birthday on october

ताज्या बातम्या