Video : ‘बॉईज २’ चा टीझर पाहिलात का ?

‘हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे’ अशी धम्माल टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरने अल्पावधीतच तुफान प्रसिद्धी मिळवली आहे.

विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ या चित्रपटातील ‘आम्ही लग्नाळू’ या गाण्याने तरुणाईला तुफान वेड लावलं होतं. त्यामुळे तिच धम्माल मस्ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी चित्रपटाची टीम सज्ज झाली आहे. या चित्रपटाचा दुसरा पार्ट ‘बॉईज २’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

शाळेतल्या करामतीनंतर महाविद्यालयाची पायरी चढलेले धैर्या, ढुंग्या आणि कबीर आता ‘बॉईज २’ मध्ये डबल धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘हाईट छोटी आहे, पण फाईट मोठी आहे’ अशी धम्माल टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरने अल्पावधीतच तुफान प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे या पोस्टरनंतर ‘बॉईज २’ चा धमाकेदार टीझर नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच करण्यात आला आहे.

प्रदर्शित झालेल्या टीझरमधून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांची लंपटगिरी आपल्याला पहावयास मिळते. शाब्दिक कोट्यांची युथफुल मस्ती दाखवणारा हा टीझर तरुणाईला नादखुळा करून सोडत आहे. विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ चा हा सिक्वेल ५ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Launches boys 2 teaser marathi movie