लावणी नृत्यांगना गौतमी पाटील तिच्या नृत्या बरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनेकदा तिच्या नृत्य सादरीकरणामुळे तिच्यावर टीका केली जाते, तर याबरोबरच आतापर्यंत यामुळे अनेक वादही निर्माण झाले आहेत. पण तिची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. ती लग्न कधी करणार याची तिचे चाहते वाट बघत आहेत. तर आता तिने त्यावर भाष्य केलं आहे.

गौतमीचा चाहतावर्ग मोठा आहे. अनके समारंभांना गौतमीचे लावणी कार्यक्रम आयोजित केले जातात. गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दीही झालेली पाहायला मिळते. तिच्या अदांमुळे अनेक तरुण घायाळ होतात. तर आतापर्यंत तिला अनेकांनी लग्नाची मागणीही घातली आहे. गौतमी पाटीलचा बॉयफ्रेंड कोण? ती लग्न कधी करणार याची अनेकदा चर्चा रंगत असते. तर आता गौतमीनेच या चर्चांबद्दल मौन सोडत तिला लग्नासाठी कसा मुलगा हवा हे सांगितलं आहे.

आणखी वाचा : Video: ‘माझा कारभार सोपा नसतोय रं’! गौतमी पाटीलच्या नवीन गाण्यात तिच्या नखरेल अदा पाहून प्रेक्षक म्हणतात…

‘एबीपी माझा’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मी इतक्यात लग्न करणार नाही. माझ्या मनात जोपर्यंत येत नाही किंवा माझी आई मला जोपर्यंत म्हणत नाही… आजही माझ्या घरात माझ्या लग्नाचा विषय निघतो. तू लग्न कधी करणार? असं मला विचारत असतात. त्यामुळे घरचे जेव्हा ठरवतील आणि मला जेव्हा मनापासून वाटेल तेव्हा मी लग्न करेन. मी अरेंज मॅरेज करेन. मी आतापर्यंत अनेक गोष्टींमधून गेले आहे आणि त्या सगळ्या गोष्टी स्वीकारणारा नवरा मला हवा आहे.”

हेही वाचा : नृत्यांगना गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले, प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयात उपचार सुरू

पुढे ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याची पसंती माझ्या आईचीही असेल आणि माझीही असेल. आईची पसंतीही माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. मी आईला एकटीला कधीही सोडू शकत नाही. मी घरी आल्यावर आई मला दिसली नाही तर माझी चिडचिड होते. तिला मला कोणी नाही आणि माझ्याशिवाय तिला कोणी नाही. त्यामुळे याचाही विचार मी लग्न करताना निश्चितच करेन.”

Story img Loader