अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’मध्ये झळकणार ‘जब वी मेट’मधील हा अभिनेता

रिमेकप्रमाणे या चित्रपटातही व्हिलन एक भ्रष्ट आमदार असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग एप्रिल महिन्यातच सुरु झाले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तमिळ कॉमेडी भयपट ‘कंचना’चा रिमेक आहे.

‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार, या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत अभिनेता तरुण अरोरा दिसणार आहे. तरुणने २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘जब वी मेट’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात त्याने करीनाच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारली होती. या भूमिकेचे नाव अंशुमन होते. याव्यतिरिक्त अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रिमेकप्रमाणे या चित्रपटातही व्हिलन एक भ्रष्ट आमदार असणार आहे. यावर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कंचना ३’ मध्ये तरुणने दिग्दर्शक राघव यांच्यासोबत काम केले होते.

या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. या चित्रपटात अक्षयसह अभिनेते अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्स या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून ५ जून २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. खिलाडी कुमार हा एक असा अभिनेता ज्याचे वेगवेगळे प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरले. ‘लक्ष्मी बॉम्ब’मधील अक्षयची भूमिका अत्यंत वेगळी आहे हे पोस्टर पाहूनच लक्षात येते. हा लूक पाहून चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Laxmi bomb jab we met akshay kumar kiara advani djj

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या