अभिनेत्री अनुष्का शर्माच्या बुलबुलपासून ते सैफ अली खानच्या तांडवपर्यंतच्या अनेक चित्रपट आणि वेब सिरीजवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आले आहेत. याच यादीमध्ये आता काली या माहितीपटाचा समावेश झाला आहे. भारतीय चित्रपट निर्मात्या असणाऱ्या लिना मणीमेकल यांच्या या माहितीपटावर जोरदार टीका होताना दिसत आहे. कालीमातेचा अपमान या माहितीपटाच्या पोस्टरमधून करण्यात आला दावा अनेकांनी केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिना यांनी सोशल मीडियावर नुकताच त्यांच्या काली या माहितीपटाचं पोस्टर शेअर केला. ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा नावाच्या कार्यक्रमादरम्यान अगा खान संग्रहालयामध्ये हे पोस्टर लॉन्च करण्यात आलं.

नक्की वाचा >> कलिंगडं द्या, घराचे मालक व्हा! नव्या घरांसाठी Down Payment म्हणून शेतमाल स्वीकारण्याची भन्नाट ऑफर, पण…

हे पोस्टर पाहून अनेकांनी सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केलाय. हिंदू देवतेच्या अवतारात एक महिला या पोस्टरवर दिसत आहे. मात्र ही महिला सिगारेट ओढताना दिसत आहे. या पोस्टरवरील या महिलेच्या मागील बाजूस समलैंगिकतेसंदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे. तुम्हीच पाहा लिना यांनी पोस्ट केलेलं हे पोस्टर…

हे पोस्टर पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी लिना यांच्याविरोधात पोस्ट केल्या आहेत. एका युझरने, “हिंदू भक्तांच्या भावना दुखावण्याचा हा मुद्दाम केलेला प्रयत्न आहे. व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य याचा अर्थ असा नाही की सर्जनशीलतेच्या नावाखाली तुम्ही काहीही कराल. हे डिजीटल माध्यमांवरही कसं प्रकाशित होऊ दिलं?, हे काढून टाका”, असं म्हटलंय. तर अन्य एकाने, “मी लिना मणीमेकल यांना विनंती करतो की हे पोस्टर काढून टाकावं, यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. समाजातील मोठ्या घटकाच्या भावनांचा सन्मान आगा खान संग्रहालयाकडून दाखवण्यात यावा,” असं म्हटलंय. “हे पोस्टर पाहून धक्का बसला आहे. एम. एफ हुसैन यांच्यापासून तुमच्यापर्यंत सर्वांनाच हिंदू देवी-देवांचा सन्मान न करण्यातून आनंद मिळतो आणि हाच तुमचा उद्देश असतो. हे आक्षेपार्ह आहे कृपया हे काढून टाकावे. हे मानसिक दृष्ट्या त्रास देणारेही आहे,” असं अन्य एकाने म्हटलंय. पाहूयात काही कमेंट्स…

१)

२)

३) काहींनी थेट गृहमंत्र्यांना टॅग केलंय

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी लिना यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. लिना मणीमेकल यांना अटक करा अशा अर्थाचा ‘#ArrestLeenaManimekal’ हा हॅटशॅग अनेकांनी वापरलाय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leena manimekalai draws flak for deliberately hurting hindu sentiments with poster of kaali netizens demand strict action scsg
First published on: 04-07-2022 at 09:53 IST