गेल्या कित्येक दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर होत आहेत. अनेक देश या दोन देशांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही देश रशिया विरुद्ध युक्रेनला मदत करत आहेत. बऱ्याच पाश्चिमात्य देशांनी रशियावर विविध निर्बंध लादले आहेत. चहूबाजूंनी रशियाची कोंडी करण्याचा या देशांचा मानस आहे. अशातच आता प्रसिद्ध अभिनेता लिओनार्डो डि कॅप्रियो युक्रेनच्या मदतीसाठी धावून आला आहे. त्याने युक्रेनला जवळपास ७७ कोटी रुपयांची मदत केली आहे. टायटॅनिक या चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता लिओनार्डो डि कॅप्रियो याने युक्रेनला तब्बल १० मिलियन यूएस डॉलर्सची मदत केली आहे. त्याने केलेली ही मदत युक्रेनसाठी मोठा आर्थिक आधार ठरणार आहे. भारतीय चालनानुसार त्याने युक्रेनला जवळपास ७६ कोटी ८८ लाख ९५ हजार रुपये मदत म्हणून दिले आहे. लिओनार्डो डी कॅप्रियोच्या या कृतीमुळे त्याचे चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. याशिवाय, ते इतर कलाकारांनाही अशी मदत करण्याचे आवाहन करत आहेत. “ते राजा अन् आम्ही…”, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने कपिल शर्माच्या शो वर केले गंभीर आरोप https://twitter.com/visegrad24/status/1500489315759144962?s=20&t=iRmqUMV4zOzI-k9GTIKamg दरम्यान, लिओनार्डो डि कॅप्रियो याचे युक्रेनसोबत एक वेगळे नाते आहेत. या नात्यामुळेच तो युक्रेनच्या मदतीला धावून आला आहे. लिओनार्डो डि कॅप्रियोची आजी युक्रेन देशातील ओडेसा भागात राहणारी होती. म्हणूनच त्याचे या देशासोबत जवळचे नाते आहे. १० मिलियन डॉलरची मदत करून त्याने हे नाते अधिक घट्ट केले आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’नंतर आलिया भट्ट करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण, चित्रपटाचे नावंही ठरलं! लिओनार्डो डि कॅप्रियो सोबतच, गायिका गिगीने सोशल मीडियावर घोषणा केली की फॅशन वीकमध्ये ती जे काही कमावेल, ते ती युक्रेनच्या लोकांसाठी मदत म्हणून देईल. गिगीने फॅशन वीकचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, 'फॅशन मंथ शेड्यूल सेट करण्याचा अर्थ असा आहे की माझे सहकारी आणि मी इतिहासातील हृदयद्रावक आणि वेदनादायक काळात अनेकदा नवीन फॅशन संग्रह सादर करतो. आमच्या कामाच्या वेळापत्रकावर आमचे नियंत्रण नाही, परंतु आम्ही काहीतरी काम करू शकतो. फॉल २०२२ शोमधून कमावलेले पैसे सर्व पैसे मी युक्रेनला मदत करण्यासाठी देईन.'