‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटवर बिबट्याची दहशत

एका दृश्याच्या चित्रिकरणादरम्यान सेटवर आला बिबट्या

चित्त्याच्या येण्याने मालिकेच्या सेटवर भितीचे वातावरण पाहायला मिळाले

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका सध्या बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे. मालिकेच्या कथानकामुळे टेलिव्हिजन विश्वात ‘ये रिश्ता..’चर्चेत आहेच. पण, गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील अभिनेता मोहसीन आणि शिवांगी यांच्या प्रेमप्रकरणानेही अनेकांचेच लक्ष वेधले आहे. मोहसीन-शिवांगीच्या चर्चा थांबत नाहीत तोच पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मिलिकेकडे वळल्या आहेत. पण, यावेळी मात्र मालिका चर्चेत येण्याचे कारण म्हणजे मालिकेच्या सेटवर दाखल झालेला एक पाहुणा आहे. अर्थात या पाहुण्याच्या अनपेक्षित एण्ट्रीने अनेकांना धडकीही भरली. बॉलिवूड लाइफ या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या सेटवर बिबट्या आल्यामुळे गोंधळाचे आणि भितीचे वातावरण पाहायला मिळाले.

बॉलिवूड लाइफने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कार्तिक (मोहसीन) आणि नायरा (शिवांगी) यांच्यात एका दृश्याचे चित्रिकरण सुरु असतानाच त्यावेळीच तिथे एक प्राणी आला. तो बिबट्याअसल्याची गोष्ट कोणाच्याच लक्षात आली नाही. पण, मालिकेच्या दिग्दर्शकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी सर्वांना आहे त्याच ठिकाणी उभे राहण्यास सांगितले. त्यासोबतच त्यांनी कोणीही पळापळ करु नये असेही सर्वांना सांगितले.

बिबट्या सेटवर आल्यामुळे अनेकांमध्ये भितीचे वातावरण पाहायला मिळाले पण, काही वेळातच तो बिबट्या सेटवरुन निघून गेला. दरम्यान, अभिनेता मोहसीनला जेव्हा या घटनेबद्दलल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, ‘एका रोमॅण्टीक दृश्याचे चित्रिकरण सुरु असताना मला शिवांगीने अचानक खेचले, कारण तेथे चित्ता आला होता. त्यावेळी मालिकेचा सर्वच चमू घाबरला होता. त्यानंतर तो चित्ता व्हॅनिटी व्हॅनजवळ गेला. पण, त्यावेळी रात्री सर्वजण सजग होते.’ याआधीही ‘ये रिश्ता….’च्या सेटवर आग लागली होती, त्यावेळी सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नव्हती.

मालिकांच्या सेटवर होणारे अपघात आणि कलाकारांची सुरक्षितता हे प्रश्न गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातही चित्रिकरणादरम्यान अचानक बिबट्याच्या येण्याने गोंधळाच्या वातावरणामुळेही आता चित्रनगरीमध्ये मालिकांच्या निर्मात्यांतर्फेच जास्त दक्षता बाळगली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Leopard spotted on the sets of serial yeh rishta kya kehlata hai

ताज्या बातम्या