Liam Payne Death : हॉलीवूडचा लोकप्रिय स्टार गायक आणि ‘बॉयबँड- वन डायरेक्शन’चा माजी सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लियाम पायनेचं निधन झालं आहे. अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्समध्ये हॉटेलच्या बाल्कनीतून पडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लियाम पायने फक्त ३१ वर्षांचा होता. त्याच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
ब्यूनस आयर्स येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जेंटिनामधल्या ट्रेंडी पालेर्मो भागातील, कासा सुर या हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून तो ( Liam Payne ) खाली पडला. यानंतर गायकाला गंभीर दुखापत झाली आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पालेर्मो भागातील स्थानिक पोलीस म्हणाले, “आम्हाला पालेर्मो येथील हॉटेलमधून ड्रग्ज, मद्य सेवन केलेल्या एका व्यक्तीचा कॉल आला होता. यानंतर आम्ही हॉटेलच्या दिशेने रवाना झालो.” तसेच हॉटेल व्यवस्थपकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना हॉटेलच्या मागे मोठा आवाज ऐकू आला… जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा त्यांना एक व्यक्ती बाल्कनीतून पडल्याचं दिसलं. यानंतर मदतीसाठी आलेल्या कामगारांनी ३१ वर्षीय ब्रिटीश गायकाचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.
हेही वाचा : Miss India चा खिताब जिंकणारी उज्जैनची निकिता पोरवाल आहे तरी कोण? अवघ्या १८ व्या वर्षी केलेली करिअरची सुरुवात, जाणून घ्या…
गायकाच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
गायकाच्या ( Liam Payne ) मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना, MTV ने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “लियाम पायनेच्या निधनाबद्दल ऐकून खूप दु:ख झालं. त्याचे चाहते आणि कुटुंबीयांबरोबर आमच्या संवेदना कायम आहेत.”
We’re deeply saddened to learn of Liam Payne’s tragic passing today. During this difficult time, our hearts remain with his family, loved ones, and fans. pic.twitter.com/OT63aeAvGO
— MTV (@MTV) October 16, 2024
हेही वाचा : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानचं कुटुंब चिंतेत! भाऊ अरबाज म्हणाला, “सध्या बऱ्याच गोष्टी…”
दरम्यान, लियाम पायनेला ( Liam Payne ) ‘वन डायरेक्शन’ या बँडमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. हा बँड २०१० मध्ये एक्स फॅक्टर शो दरम्यान तयार झाला होता. या बँडची सगळी गाणी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. विशेषत: या बँडचं night changes हे गाणं गेल्या काही महिन्यांपासून इन्स्टाग्राम रील्सवर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. २०१६ मध्ये या बँडचे सगळे सदस्य वेगळे झाले. सध्या लियामचे जगभरातील चाहते त्याच्या आकस्मिक निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत आहेत.