दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ हा चित्रपट मनोरंजन विश्वात सुरुवातीपासूनच चांगला दबदबा निर्माण करण्यात यशस्वी ठरला होता. गेले अनेक महिने विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होते. देशातल्या विविध शहरात फिरून त्यांनी या चित्रपटाचे प्रमोशन केले होते. विजय देवरकोंडा याने मध्यंतरी प्रमोशन दरम्यान बॉयकॉटबद्दल एक वक्तव्य केलं होतं. यामध्ये तो म्हणाला की “ज्यांना चित्रपट बघायचा आहे ते बघतील आणि ज्यांना नसेल बघायचा ते बघणार नाहीत.

विजय अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. नेटकरी देखील त्याला ट्रोल करत आहेत. विजयने याआधी देखील दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे. नेटकऱ्यांनी त्याच्या एका जुन्या चित्रपटातील सीन सध्या ट्विटरवर व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ अभिनेता विजय देवरकोंडाच्या ‘द्वारका’ चित्रपटातील आहे. या क्लिपमध्ये देवाचा अपमान झाल्याचा दावा करत काही लोक हे शेअर करत आहेत. दाक्षिणात्य स्टार्सही धार्मिक भावना दुखावत असतील तर त्यांच्यावर बहिष्कार का टाकला जात नाही, असा प्रश्नही ते विचारत आहेत.

NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ
Tata Altroz Racer to launch in coming weeks
मारुती, महिंद्रा, ह्युंदाईची उडाली झोप, टाटा ‘या’ हॅचबॅक कारला देशात आणतेय स्पोर्टी अवतारात; कधी होणार विक्री?
India is the third most polluted country in the world What are the potential dangers of this
विश्लेषण : भारत जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश! यातून कोणते धोके संभवतात?

भारतीय संघाच्या विजयानंतर निर्माते असितकुमार मोदी यांना पडला ‘हा’ प्रश्न!! नेटकऱ्यांनी केले ट्रोल

या व्हिडिओमध्ये विजय देवराकोंडा मंदिरातून श्रीकृष्णाची मूर्ती चोरताना दिसत आहे. तेव्हाच मंदिरात उपस्थित असलेले लोक जागे होतात आणि त्याला पकडायला जातात. धावत असताना त्याची एका मुलीशी टक्कर होते. तिला पाहून तो सर्व काही विसरून जातो आणि एका हातात मूर्ती धरून मुलीला त्याच्याकडे ओढतो आणि जबरदस्तीने तिच्या ओठावर चुंबन घेतो. एकाने ट्विटमध्ये लिहिले, ‘आता त्याचे करिअरही संपणार आहे. अशा हिंदुद्वेष्ट्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला पाहिजे.

यावेळी बॉलिवूडवर बहिष्कार टाकला जात आहे. हिंदी चित्रपटांमध्ये हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. याशिवाय आता दाक्षिणात्य चित्रपटातील धार्मिक भावना दुखावणारे सीन्स व्हायरल होताना डोसून येत आहेत. विजयचा ‘लाइगर’ नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे, आमीर आणि अक्षयच्या चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. एवढंच नाही तर आयएमडीबी या साईटवर सर्वात कमी रेटिंग मिळालेला भारतीय चित्रपट म्हणून ‘लाइगर’चं समोर आलं आहे.