प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि गीतकार लिसा मेरी प्रेस्ली यांचं निधन झालंय. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लिसा मेरी प्रेस्ली दिवंगत अमेरिकन अभिनेता, गायक, संगीतकार एल्विस प्रेस्ली यांची मुलगी होती. तसेच त्या दिवंगत पॉप गायक व डान्सर मायकल जॅक्सन यांनी पूर्व पत्नी होत्या. मेडिकल इमर्जन्सीमुळे लिसा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. ‘टीएमझेड’च्या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, लिसा यांना लॉस एंजेलिस येथील घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना गुरुवारी रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

दरम्यान, लिसा प्रेस्ली यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. “माझी सुंदर मुलगी लिसा मेरी आम्हाला सोडून गेली आहे, ही बातमी मी जड अंतःकरणाने तुम्हा सर्वांशी शेअर करत आहे. ती मला माहीत असलेली सर्वात मजबूत आणि प्रेमळ स्त्री होती. आम्ही या दुःखद परिस्थितीत आमची प्रायव्हसी जपण्याची विनंती करतो,” असं त्यांची आई प्रिसिला प्रेस्ली यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

Arushi Sharma Married to Casting Director vaibhav vishant
कार्तिक आर्यनच्या हिरोइनने गुपचूप उरकलं लग्न, सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आहे पती, फोटो आले समोर
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
Karan Sharma Ties Knot With actress Pooja Singh
Video: पाच वर्षांपूर्वी मोडलं पहिलं लग्न, प्रसिद्ध अभिनेत्याने ९ वर्षांनी लहान अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ व्हायरल

लिसा प्रेस्ली यांनी दिवंगत मायकल जॅक्सन यांच्याशी लग्न केलं होतं. पण, दोन वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. दोघांचे लग्न १९९४ ते १९९६ पर्यंत टिकले होते. मायकल जॅक्सनशी लग्न केल्यानंतर आपल्याला मुलं जन्माला घालण्याची भीती वाटत होती, असा खुलासा त्यांनी एकदा केला होता. “माझ्यावर मुलं जन्माला घालण्यासाठी दबाव होता आणि मलाही मुलं हवी होती. पण मी भविष्याचा विचार करायची. कारण मला मुलांच्या कस्टडीसाठी मायकल जॅक्सनबरोबर कधीच भांडण नको होतं,” असा खुलासा प्रेस्ली यांनी एका टॉक शोमध्ये केला होता.

शाहरुखचे तीन चित्रपट अन् कडक सॅल्युट; चाहत्याने फोटो शेअर करताच अभिनेता भावूक, म्हणाला, “मागच्या अनेक वर्षांत…”

दरम्यान, लिसा प्रेस्ली यांनी संगीत कारकिर्दीची सुरुवात २००३ मध्ये अल्बम ‘टू हूम इट मे कन्सर्न’ पासून केली होती. त्यानंतर त्यांचा ‘नाऊ व्हॉट’ हा अल्बमही खूप गाजले होते.