Big Boss 10: मनवीर गुर्जर ठरला ‘बिग बॉस १०’ चा विजेता

‘मनवीरच्या कामगिरीमध्ये सातत्य होते त्यामुळेच तो ही स्पर्धा जिंकू शकला’

मनवीर गुर्जर ठरला बिग बॉस १० चा विजेता

मनवीर गुर्जर हा बिग बॉस १० चा विजेता ठरला. मनवीर गुर्जर हा सर्वात लोकप्रिय स्पर्धक ठरला आहे. बानी जज ही द्वितीय क्रमांकावर आहे. मनवीर अत्यंत नम्र आहे असे सर्व स्पर्धकांचेही म्हणणे आहे. या स्पर्धेतील एक स्पर्धक राहुल देवनी ही घोषणा सर्वप्रथम केली. लोपामुद्रा राऊत स्पर्धेबाहेर पडल्यानंतर बानी जे आणि मनवीर गुर्जर हे दोघेच स्पर्धेत राहिले.

स्पर्धा सुरू झाल्यापासूनच मनवीरच्या कामगिरीमध्ये सातत्य होते. त्यामुळेच तो बिग बॉस जिंकू शकला, असे स्पर्धकांचे म्हणणे आहे. मनवीरला ५० लाखांचे बक्षीस मिळाले आहे. अत्यंत भावनिक वातावरणात त्याने बक्षीस स्वीकारले.

बिग बॉस १० चा ग्रॅंड फिनाले सलमान खानच्या धमाकेदार नृत्याने झाली. सर्वात आधी चार अंतिम स्पर्धकांचा परिचय करुन देण्यात आला. त्यांच्या नातेवाईकांसोबत सलमान खानने थोडी बातचीत केली. बिग बॉसमध्ये राहायला गेल्यापासून सर्वांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो. गेल्या तीन महिन्यांमध्ये काय झाले याची काहीच खबरबात त्यांना नसते. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांमधील महत्त्वपूर्ण घटना स्पर्धकांना सांगण्यात आल्या. नोटाबंदीचा निर्णय या स्पर्धकांनी पहिल्यांदा ऐकला. त्यांच्या चेहऱ्यावर चकित झाल्याचे हावभाव स्पष्ट दिसत होते.

त्यानंतर एक ट्विस्ट देण्यात आला. चार स्पर्धकांमध्ये एक बजर राऊंड घेण्यात आला. जो सर्वात पहिले बजर दाबेल तो या स्पर्धेबाहेर होईल असे सांगण्यात आले. परंतु, त्याला १० लाख रुपये देखील मिळतील असे जाहीर केले गेले. जर तुम्ही थांबला आणि हारला तर काहीच मिळणार नाही परंतु आताच तुम्ही निघून गेला तर तुम्हाला १० लाख रुपये मिळतील असे सलमान खानने सांगितले.

यानंतर, मनू पंजाबीने बजर दाबले आणि स्पर्धेबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. जर तो स्पर्धेत थांबला असता तर प्रेक्षकांनी केलेल्या मतदानानुसार तो हारला असता. सर्व स्पर्धकांमध्ये तोच पाठीमागे होता त्यामुळे त्याच्या निर्णयाचे सलमान खानने कौतुक केले.

त्यानंतर बिग बॉसच्या सेटवर हृतिक रोशन आणि यामी गौतम आले. हृतिक रोशनने सलमान खान सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सुरुवातीच्या काळापासूनच सलमान खानने आपल्यावर विश्वास ठेवला त्यामुळे आपण त्याचे आज इथे आभार मानतो असे हृतिक रोशनने म्हटले. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी भाग मिल्का भाग हवन करेंगे हे गाणे म्हटले. त्यानंतर अनेक बहारदार गीतांनी त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Live big boss grand finale salman khan bani judge manveer gurjar lopamudra raut

ताज्या बातम्या