scorecardresearch

“मी आईच्या मैत्रिणीसोबत सेक्स केल्याचं समजताच…”; ‘लॉक अप’ फेम शिवम शर्माने सांगितली कुटुंबियांची प्रतिक्रिया

‘लॉक अप’मध्ये असताना शिवमने हा खुलासा केला होता.

“मी आईच्या मैत्रिणीसोबत सेक्स केल्याचं समजताच…”; ‘लॉक अप’ फेम शिवम शर्माने सांगितली कुटुंबियांची प्रतिक्रिया
(फोटो – व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

टीव्ही अभिनेता शिवम शर्मा या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या ओटीटी रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ शोमध्ये दिसला होता. कंगना रणौत सुत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये शिवमने त्याच्या खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. शोमध्ये शिवमने सांगितलं होतं की, त्याने एकदा त्याच्या आईच्या मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. पण जेव्हा त्याच्या कुटुंबाला हे कळालं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती? याबद्दल आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवमने खुलासा केला आहे.

हेही वाचा – KBC मध्ये एक कोटी रुपयांसाठी स्पर्धकाला विचारण्यात आला ‘हा’ प्रश्न; तुम्हाला उत्तर माहितीये का?

शिवमने सांगितले की, “हा एपिसोड प्रसारित होताच माझं वक्तव्य ऐकून माझ्या संपूर्ण कुटुंबाने ती महिला कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. माझ्या मावशी आहेत, त्यांनी आईला फोन केले आणि विचारलं. तसेच सगळे मिळून तिचा शोध घेत होते. ही 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मग आपण तेव्हा कुठे राहत होतो आणि मी कोणत्या आईच्या मैत्रिणीबद्दल बोलतोय, याबद्दल शोध सुरू झाला. दरम्यान, माझ्या पालकांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ते मला काहीच बोलत नाही, आजपर्यंत त्यांनी मला नेहमीच साथ दिली आहे,” असं शिवम म्हणाला.

हेही वाचा – ‘या’ कलाकारांचे होते को-स्टारशी अफेअर; पण ब्रेकअपनंतर निवडले इंडस्ट्रीबाहेरचे पार्टनर

या शोमध्ये असताना स्पर्धकांना नॉमिनेशनपासून वाचवण्यासाठी स्वतःविषयी असलेलं एक डार्क सिक्रेट सांगायचं होतं. अशा परिस्थितीत शिवम शर्माने शोमध्ये बझर दाबून एक धक्कादायक खुलासा केला होता. शिवमचे त्याच्या आईच्या मैत्रिणीशी शारीरिक संबंध होते आणि ती घटस्फोटित होती, असं सांगितलं होतं. याविषयी बोलताना शिवम म्हणाला होता, “एक घटस्फोटित महिला माझ्या घराजवळ राहत होती. ती माझ्या आईची मैत्रिण होती. ती घटस्फोटित होती आणि मला तिला सेक्शुअल लाइफमध्ये मदत करायची होती. मी मस्त व्हाईट सॉस पास्ता बनवतो, म्हणून मी व्हाईट सॉस पास्ता त्यांच्या घरी घेऊन जायचो आणि त्यांच्यासोबत बराच वेळ घालवायचो. ही खूप जुनी गोष्ट आहे, मी कॉलेजमध्ये असताना हे घडलं होतं.” शिवमने शोमध्येच या घटनेचा खुलासा केल्याने त्याच्या कुटुंबियांनाही धक्का बसला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.