scorecardresearch

“…म्हणून मी आत्महत्येचा प्रयत्न केला” Lock Upp मध्ये अंजली अरोराचा धक्कादायक खुलासा

अंजली अरोरानं स्वतःबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

lock upp, kangana ranaut, anjali arora, anjali arora commit suicide, kangana ranaut show, lock upp show, अंजली अरोरा, लॉक अप शो, कंगना रणौत शो, कंगना रणौत, अंजली अरोरा खुलासा, अंजली अरोरा इन्स्टाग्राम
अंजलीनं सांगितलं की कॉलेजमध्ये असताना तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

कंगना रणौतचा रिअलिटी शो ‘लॉकअप’ शोमध्ये प्रत्येक सदस्य स्वतःला या शोमधून बाहेर पडण्यापासून वाचवण्यासाठी काही ना काही गुपित शेअर करताना किंवा खुलासा करताना दिसतात. याच टास्कमध्ये अंजली अरोरानं नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये सायशा शिंदे, पूनम पांडे आणि अंजली अरोरा या तिघी एलिमिनेशन राऊंडमध्ये होत्या. त्यानंतर कंगनानं अंजली सुरक्षित असल्याचं सांगितलं. पण तरीही अंजलीनं स्वतःबाबत एक सीक्रेट शेअर केलं.

अंजलीनं सांगितलं की कॉलेजमध्ये असताना तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ती म्हणाली, “मी नेहमीच माझ्या भावासोबत शाळेत किंवा कॉलेजमध्ये जायचे. माझा भाऊ देखील इतर भावांप्रमाणे प्रोटेक्टिव होता. पण जेव्हा एक दिवस तो माझ्यासोबत नव्हता, त्यावेळी मी पहिल्यांदा ट्यूशनला न जाता मित्रांसोबत हुक्का पिण्यासाठी गेले. मला कॅफेमध्ये त्याच्या मित्रांनी पाहिलं आणि त्याला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर माझा भाऊ कॅफेमध्ये आला आणि माझ्या कानाखली मारून मला स्वतःसोबत घरी घेऊन गेला. एवढंच नाही तर त्याने ही गोष्ट बाबांना देखील सांगितली आणि त्यांनी देखील मला मारलं.”

आणखी वाचा- Fact Check: मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

अंजली पुढे म्हणाली, “त्यावेळी माझ्या घरी माझं शिक्षण बंद करण्यापर्यंत चर्चा सुरू होत्या. मी त्यामुळे एवढी घाबरून गेले होते की फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.” अंजलीचं हे बोलण्या ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

दरम्यान सध्या लॉकअप शो संपण्यासाठी आता काही आठवडे उरले आहेत. त्यामुळे फिनाले आधी कैद्यांमध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lock upp anjali arora revealed that she wanted to commit suicide mrj

ताज्या बातम्या