scorecardresearch

“तो माझ्या बाथरुममध्ये…”, ट्रान्सवूमन सायशा शिंदेनं बॉयफ्रेंडबाबत केला धक्कादायक खुलासा

सायशा शिंदेनं लॉकअप शोमध्ये बॉयफ्रेंडबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

Saisha Shinde, lock upp, poonam pandey, payal rohatagi, saisha shinde boyfriend, सायशा शिंदे, लॉक अप शो, सायशा शिंदे पूनम पांडे, पायल रोहतगी, कंगना रणौतसायशा शिंदे ही मूळची महाराष्ट्रातील असून तिचं पूर्वीच नाव स्वप्नील असं होतं.
सायशा शिंदे ही मूळची महाराष्ट्रातील असून तिचं पूर्वीच नाव स्वप्नील असं होतं.

काही दिवसांपूर्वीच सुरू झालेला कंगना रणौतचा ‘लॉक अप’ शो सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. या शोमधील सदस्य लॉकअपमध्ये त्यांच्या आयुष्यातील भूतकाळ तसेच चांगले किंवा वाईट अनुभव एकमेकांसोबत शेअर करताना दिसतायत. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरही होतेय. काही दिवसांपूर्वीच पूनम पांडेनं तिच्या आयुष्यातील कठीण काळाचा खुलासा केला होता. तसेच निशा रावलनंही तिच्या घटस्फोटाबाबत काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानंतर आता जेंडर बदलून ट्रान्सवूमन झालेल्या सायशा शिंदे हिनेही तिच्या बॉयफ्रेंडबद्दल काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे.

सायशा शिंदे ही मूळची महाराष्ट्रातील असून तिचं पूर्वीच नाव स्वप्नील असं होतं. ती एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि त्यामुळे तिला बराच मनस्ताप सहन करावा लागला होता. लॉकअपमध्ये पूनम पांडेसोबत बोलत असताना सायशानं आपला कटू अनुभव शेअर केला. ती म्हणाली, ‘या नात्यात माझ्यावर शारिरीक नाही तर मानसिक अत्याचार झाले होते. हे खूपच वाईट होतं. तो मला खूप चुकीच्या पद्धतीने वागवत असे. जसं की मी कोणीतरी घाणेरडी व्यक्ती आहे.’

आणखी वाचा- खरंच की काय! वर्षाअखेरीस लग्नाच्या बेडीत अडकणार ‘बाहुबली’ प्रभास?

सायशा पुढे सांगते, ‘तो माझ्या दरवाजाच्या समोर उभा राहून वाट पाहत असे की कोणीतरी मला भेटायला येईल. तो मला त्याच्यासोबत रंगेहात पकडेल आणि याचा माझ्या विरोधात वापर करेल. मी त्याला फसवेन असं त्याला नेहमीच वाटत असे. एवढंच नाही तर तो माझ्या घराच्या छतावर जाऊन माझ्या बाथरुममध्ये डोकावत असे. मी हस्तमैथुन्य करत आहे की काय हे त्याला त्यावेळी जाणून घ्यायचं होतं. याचा माझ्या विरोधात वापर करण्याचा प्लान होता.’

आणखी वाचा- ‘भारताचे राष्ट्रपती कोण?’ असा प्रश्न विचारताच प्रसिद्ध अभिनेत्रीची बत्ती गुल; वाचा नेमकं काय घडलं

सायशाच्या या खुलाशावर पायल रोहतगीनं तिला विचारलं की ती हस्तमैथुन्य का करू शकत नव्हती. त्यावर सायशा म्हणाली, ‘मी त्याच्यासोबत शारिरीक संबंधांसाठी नकार दिला होता. मी त्या नात्यात अजिबात आनंदी नव्हते. त्यामुळे असं करणं मला योग्य वाटलं.’ दरम्यान सायशा शिंदेनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला वयाच्या १५ व्या वर्षी पुरुषांमध्ये रुची जाणवलं होतं. त्यानंतर तिने काही काळ थेरपी घेतली आणि वयाच्या ४० व्या वर्षी सर्जरी करून ती ट्रान्सवूमन झाली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lock upp saisha shinde open up on shocking fact about her boyfriend mrj

ताज्या बातम्या