अभिनेत्री कंगना रणौतचा ‘लॉकअप’ शो सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या शोमध्ये बऱ्याच बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांनी सहभाग घेतला आहे. ज्यात करणवीर बोहरा, पूनम पांडे, मुनव्वर फारूखी, बबिता फोगट, पायल रोहतगी, सीमा रावत या कलाकारांचा या शोमध्ये सामावेश आहे. कंगनाच्या जेलमध्ये राहणं या सर्वच सेलिब्रेटींसाठी कठीण जात आहे. पण यासोबत त्यांच्या सामान्य ज्ञानाचाही कस लागताना दिसत आहे. जेव्हा या शोमध्ये देशाचे राष्ट्रपती कोण? हा प्रश्न विचारला तेव्हा सर्वांचीच बत्ती गुल झाली. एवढंच नाही तर राजकीय मुद्द्यांवर सातत्यानं भाष्य करणाऱ्या अभिनेत्रीलाही याचं उत्तर देता आलं नाही.

लॉकअपच्या एका एपिसोडमध्ये सर्व सदस्य एक खेळ खेळताना दिसले. टीम ब्लू आणि टीम ऑरेंज तयार करण्यात आली होती. या टास्कमध्ये सर्व सदस्यांची ताकद आणि सामान्य ज्ञानाची परीक्षा घेण्यात आली. या टास्कमध्ये पायल रोहतगी आणि पूनम पांडे जनरल नॉलेजचा गेम खेळल्या. त्यांच्या टीममधील सदस्य सिद्धार्थ शर्मा आणि बबिता फोगट यांनी वेट लिफ्ट करायचं होतं. प्रत्येक चुकीच्या उत्तरावर सिद्धार्थ आणि बबिता यांच्या खांद्यावरील वजन वाढवलं जाणार होतं.

Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!
amar kale wardha marathi news, ramdas tadas marathi news
वर्ध्यात राष्ट्रवादीच्याच दोघांमध्ये लढत ?

आणखी वाचा- सबा आझादच्या नव्या फोटोशूटवर हृतिक रोशन फिदा, कमेंट करत म्हणाला…

क्विज राउंडमध्ये या दोन्ही टीममधील सदस्यांना भारताच्या राष्ट्रपतींचं नाव विचारण्यात आलं. मात्र सारा खान, निशा रावल, पूनम पांडे आणि पायल रोहतगी यांच्या पैकी कोणालाच याचं उत्तर माहीत नव्हतं. पण सर्वात आश्चर्यचकीत करणारं होतं जेव्हा या प्रश्नावर पायल रोहतगीलाही उत्तर न देता येणं. पायल अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय मुद्द्यांवर भाष्य करताना दिसते. पण या प्रश्नावर तिची देखील बत्ती गुल झाल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय ट्विटरला किती शब्द मर्यादा आहे? या प्रश्नाचंही अचूक उत्तर तिला देता आलं नाही. तिनं १४० असं उत्तर दिलं मात्र अचूक उत्तर होतं २८० शब्द.

आणखी वाचा- “वरुणचं कॅरेक्टर…”, मधुरीमा रॉयसोबत अफेअरच्या चर्चांवर एक्स गर्लफ्रेंड दिव्या अग्रवालनं सोडलं मौन

लॉकअपमधील या क्विज टास्कमुळे पायल रोहतगी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तिला या दोन्ही प्रश्नांची उत्तर देता न येणं हे सर्वांसाठीच धक्कादायक होतं. कारण ती अनेकदा राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडताना दिसते. पायल रोहतगीला भारताचे राष्ट्रपती कोण हे उत्तर देता आलं नाही. मात्र या प्रश्नाचं अचूक उत्तर ‘राष्ट्रपती रामनाथ कोविंद’ असं आहे. ते देशाचे १४ वे राष्ट्रपती आहे. त्यांनी जुलै २०१७ मध्ये राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारला होता.