अ‍ॅक्शन हिरो असो किंवा सुपर हिरो असो त्याला कितीही गोळ्या खाव्या लागल्या, कितीही विलक्षण संकटमालिकेतून जावं लागलं तरी तो हिरो असतो. त्यामुळे तो स्वत:ही वाचतो आणि त्याच्या जवळच्यांनाही वाचवतो. इथे तर हा हिरो ‘शिवाय’ याच नावाने समोर येत असल्याने त्याच्या मरणाचा प्रश्नच येत नाही. अजय देवगणचे दिग्दर्शन असलेला ‘शिवाय’ एक चांगला आणि हॉलीवूडच्या दर्जाचा अ‍ॅक्शनपट आहे. पण या अ‍ॅक्शनपटाची कथा ‘देव तारी त्याला कोण मारी’ या सूत्रावरच आधारित असल्याने ती अशी फुगवून सांगितली काय तशी सांगितली काय शेवट गोडच.. आणि म्हणूनच नीरस ठरतो.

‘शिवाय’ ही रूढार्थाने वडील आणि मुलीच्या नात्याची गोष्ट आहे. एका अपघाताने शिवायची ओळख बल्गेरियन तरुणीशी होते, ते एकत्र येतात. त्यांच्यात आलेल्या प्रेमसंबंधांमुळे हे नातं शिवायला वडिलांच्या नात्यापर्यंत आणून सोडतं. मात्र तिला शिवायची पत्नी आणि त्याचं मूल या दोन्ही गोष्टी नको असल्याने ती त्या दोघांना तिथेच सोडून बल्गेरियात परतते. आपल्या मुक्या मुलीला प्रेमाने वाढवणारा, तळहातावरच्या फोडासारखं जपणारा बाप मुलीच्याच आग्रहास्तव तिच्या आईला शोधत बल्गेरियात येतो. तिथे गेल्या गेल्या तो मानवी तस्करीची घटना उघडकीस आणतो आणि एका लहानग्या मुलाला त्यातून वाचवतो. मात्र या प्रकारात त्याची मुलगी याच टोळीची शिकार होते आणि मग न थांबणारा पाठलाग सुरू होतो. दिग्दर्शक म्हणून हिमालय आणि बल्गेरियाच्या पर्वतराजीत चित्रीकरण करण्याच्या अडचणींवर मात करूनही त्यातले अ‍ॅक्शन सिक्वेन्स अजय देवगणने चोख साकारले आहेत. मात्र चित्रपटाच्या पूर्वार्धातला खूपसा भाग शिवाय आणि बल्गेरियन तरुणीच्या प्रेमकथेवर वाया गेला आहे. तीच गोष्ट पाठलागाच्या दृश्यांबाबत झाली आहे. एकापाठोपाठ एक येणारी ही दृश्ये थरारक असली तरी एके क पाठलागाच्या दृश्याची फ्रेम खूप वेळ तुमच्या नजरेसमोर रेंगाळत राहते आणि एका क्षणाला त्यातली उत्कंठा संपून त्याच्या जागी कंटाळा भरून राहतो. एकतर संपूर्ण चित्रपटात अजय देवगण आणि त्याच्या मुलीची भूमिका करणारी अ‍ॅबिगेल एम्स हे दोघं सोडले तर बाकीच्या व्यक्तिरेखा थोडयाथोडक्यासाठी का येतात?, याचं कारणच उमजत नाही. त्यातल्या त्यात हॅकरच्या भूमिकेत वीर दासच्या विनोदाचा थोडासा तरी शिडकावा आपलं मन प्रसन्न करतो. नाहीतर संपूर्ण चित्रपटभर एकाच थंड नजरेने वावरणारा, सतत कशाच्या तरी मागे पळत राहणारा, चिडणारा अजय देवगणच आपल्याला दिसतो. कुठेही हास्य नाही की हलकी गाण्याची प्रसन्नताही नाही. गाणीही बॅकग्राऊंडला वाजतात त्यामुळे तुमची सुटकाच होत नाही. अ‍ॅक्शनदृश्यांमधला वेग आणि मांडणी यात काहीएक समतोल साधला असता तर चित्रपट थोडा का होईना सुखकर वाटला असता. पण अजय देवगणचा पॉवरफुल्ल अभिनय, दिग्दर्शन असूनही ‘शिवाय’ केवळ अ‍ॅक्शनपट म्हणूनच लक्षात राहतो.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Online Betting
सट्टेबाजीत दीड कोटींचं नुकसान, कर्जाच्या वसुलीसाठी धमक्या; पत्नीने उचललं टोकाचं पाऊल!

शिवाय

  • दिग्दर्शन – अजय देवगण
  • कलाकार – अजय देवगण, एरिका कार, साएशा सेहेगल, अ‍ॅबिगेल एम्स आणि वीर दास.