मुंबई: ‘माझ्या नाटकातील सहकलाकारांनी नेहमी कौतुक करतच मला मोठे केलेले आहे. त्यामुळे नकळतपणे मी इथवर पोहोचलो आहे आणि त्यात माझे असे काही वेगळे आहे किंवा मी काही केले आहे, असे मला वाटत नाही. याक्षणी सगळय़ात जास्त आभार मानायचे असतील तर ते मी प्रेक्षकांचे मानीन, कारण तुम्ही प्रेक्षक नसता तर मी नसतो. या नाटकाच्या प्रयोगाला तुम्ही आवर्जून आलात आणि आजही एकही आसन रिकामे नाही. हा एक क्षण मी कायम लक्षात ठेवेन’, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

    अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लीनर’ या नाटकाच्या खास प्रयोगाचे शनिवारी सकाळी आयोजन करण्यात आले होते. या  प्रयोगादरम्यान अशोक सराफ यांचा पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त  सत्कार करण्यात आला. गेली पन्नास वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा हा सत्कार सोहळा अष्टविनायक नाटय़संस्था व परिवारातर्फे  आयोजित करण्यात आला होता.  ‘‘प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे आजही मला काम करण्याची स्फुर्ती मिळते, उत्साह येतो. जोपर्यंत कलाकार, प्रेक्षक, दिग्दर्शक, निर्माते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तोपर्यंत मी कोणालाही भीत नाही’’,  अशी प्रांजळ भावना यावेळी सराफ यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love audience gives me strength sentiments actor ashok saraf seventy five felicitations ysh
First published on: 05-06-2022 at 01:07 IST