‘लव्ह यु जिंदगी’मध्ये सचिन पिळगांवकर आणि कविता लाड यांची केमिस्ट्री

प्रेक्षकांच्या नवीन वर्षाची सुरुवात एकदम हटके आणि रंजक करण्यासाठी हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

love you zindagi
'लव्ह यु जिंदगी'मध्ये सचिन पिळगांवकर आणि कविता लाड यांची केमिस्ट्री

प्रेम जरी आयुष्यावर असलं तरी त्याची परिभाषा ही वयोगटानुसार वेगळी असते. अनिरुध्द दातेची तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा ‘लव्ह यु जिंदगी’ या मराठी चित्रपटाच्या टीझरमध्ये पाहायला मिळालं. टीझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद देखील दिला. प्रेक्षकांच्या नवीन वर्षाची सुरुवात एकदम हटके आणि रंजक करण्यासाठी हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘लव्ह यु जिंदगी’ मध्ये अभिनेते सचिन पिळगांवकर यांची प्रमुख भूमिका आहे आणि त्यांच्या सोबतीला अभिनेत्री कविता लाड आणि प्रार्थना बेहरे देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये तिघांचा नवा लूक आपण पाहू शकतो. तसेच कविता लाड आणि सचिन पिळगांवकर यांची जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच अनुभवयाला मिळणार आहे. इतकंच नव्हे तर कविता लाड आणि प्रार्थना बेहरे देखील पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

वाचा : ‘तुला पाहते रे’ : या दिवशी विक्रांत करणार इशाला प्रपोज

कविता लाड यांनी आजवर त्यांच्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांनी देखील त्यांच्या प्रत्येक भूमिकेला मनापासून प्रतिसाद दिला आहे. पण नवीन वर्षात ‘लव्ह यु जिंदगी’मुळे कविता लाड यांची नवी भूमिका आणि तिघांचीही पहिल्यांदाच जुळून आलेली ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.
एस. पी. प्रोडक्शन्स प्रस्तुत, सचिन बामगुडे निर्मित ‘लव्ह यु जिंदगी’ या कौटुंबिक मनोरंजन करणा-या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज सावंत यांनी केले असून हा चित्रपट ११ जानेवारी २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Love you zindagi upcoming marathi movie sachin pilgaonkar and kavita lad prarthana behre

ताज्या बातम्या