Arrest Warrant Against Sapna Chaudhary: हरियाणामधील प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीच्या अडचणी वाढल्या आहेत. लखनऊ कोर्टाने सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. सपना चौधरीवर डान्स कार्यक्रम रद्द करण्याचा तसंच तिकिटाचे पैसे परत न केल्याचा आरोप आहे. २२ नोव्हेंबरला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

१४ ऑक्टोबर २०१८ ला याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यामध्ये सपना चौधरीसोबत या कार्यक्रमाचे आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, किवद अली, अमित पांडे, रत्नाकर उपाध्याय यांचाही उल्लेख होता. आता याप्रकरणी लखनऊ कोर्टाने सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

हे प्रकरण तीन वर्ष जुनं आहे. १३ ऑक्टोबर २०१८ ला दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत स्मृती उपवनमध्ये सपना चौधऱीचा एक कार्यक्रम होणार होता. यासाठी ३०० रुपये तिकीट शुल्क आकारण्यात आलं होतं. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने तिकीटांची विक्री करण्यात आली होती. कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. पण रात्रीचे १० वाजले तरी सपना चौधऱी आलीच नाही. यानंतर प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती.

प्रेक्षकांना तिकीटाचे पैसेही परत करण्यात आले नव्हते. कोर्टाने ४ सप्टेंबर २०२१ रोजी याप्रकरणी सपना चौधरीचा अर्ज फेटाळला होता.