Video: “ते तिचं शरीर आहे ती…”; डीपनेक गाऊनसंदर्भात प्रियांकाच्या आईची पहिली प्रतिक्रिया

डीपनेक गाऊनवरुन अनेकांनी प्रियांकाला ट्रोल केलं आहे

डीपनेक गाऊनवर प्रियांकाच्या आईची प्रतिक्रिया

ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री प्रियांका चोप्राने घातलेला गाऊन चांगलाच चर्चेत आहे. या डीपनेक गाऊनवरुन अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. प्रियांकाने पती निक जोनासोबत या सोहळ्याला हजेरी लावली होती. असं असलं तरी या दोघांपेक्षा प्रियांकाच्या गाऊनवरुनच चर्चा रंगल्या आहेत. अनेकांनी प्रियांकावर यावरुन टीका केली आहे. मात्र आता प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी या प्रकरणामध्ये आपल्या मुलीची बाजू घेत ट्रोलर्सला जोरदार उत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या मधू चोप्रा?

“जे झालं त्याचा मला आनंदच आहे. यामुळे माझी मुलगी अधिक सशक्त झाली आहे. प्रियांका तिच्या मनानुसार आयुष्य जगते. जोपर्यंत ती इतर कोणाला त्रास देत नाही किंवा इजा पोहचवत नाही तोपर्यंत तीने हवं तसं जगण्यात मला काही चुकीचं वाटत नाही,” असं मत मधू चोप्रा यांनी व्यक्त केलं आहे.

 

View this post on Instagram

 

Tassel fun. #grammys

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

ड्रेसबद्दल काय म्हणाल्या?

प्रियांकाला ज्या डीपनेक गाऊनवरुन ट्रोल करण्यात आलं त्या ड्रेसबद्दलही मधू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ते तिचं शरीर आहे. तिला सुंदर शरीराची देणगी मिळाली आहे. त्या शरीराबरोबर ती काहीही करु शकते. इतकचं मी सांगू शकते,” असं मत मधू यांनी ड्रेसबद्दल बोलताना व्यक्त केलं. इतकचं नाही तर तो ड्रेस पाहिल्यानंतर आपण प्रियांकाला “तुझं आयुष्य तुझ्या पद्धतीने जग,” असा मेसेजही पाठवल्याचे मधू यांनी सांगितलं.

ट्रोलर्सवर निशाणा

“प्रियांकाला ट्रोल करणारे लोकं हे केवळ कंप्युटरच्या स्क्रीनमागे बसणारी लोकं आहेत. त्यांच्या आयुष्यात आनंदाचा तोटा आहे असंच मला वाटतं. एखाद्याबद्दल वाईट बोलल्याने लोकं आपल्याकडे लक्ष देतील असं त्यांना वाटतं. अशा ट्रोलर्सला मी जास्त किंमत देत नाही,” असा टोलाही मधू यांनी लगावला आहे.

प्रियांकाने घातलेला डीपनेक गाऊन राल्फ अॅण्ड रुसो यांनी डिझाइन केला होता. रुसो यांनी या गाऊनसंदर्भात आपल्याला अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे एका सोशल नेटवर्किंगवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Madhu chopra on priyanka being trolled for low neck grammy dress its her body she can do what she wants scsg

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन