बॉलिवूड अभिनेत्री मधुबाला एकेकाळच्या सर्वात हिट अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांच्या अभिनयाचं कौतुक आजही होताना दिसतं. मधुबाला यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. लवकरच त्यांचा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बायोपिकमध्ये मधुबाला यांच्याबाबत माहीत नसलेल्या गोष्टी देखील प्रेक्षकांना पाहायला मिळाणार आहेत. पण यात मधुबाला यांचं लव्ह लाइफ ज्यांच्यामुळे चर्चेत राहिलं ते अभिनेता किशोर कुमार आणि दिलीप कुमार यांचा उल्लेख असणार की नाही यावरून चर्चा सुरू आहे. अशात मधुबाला यांची बहीण मधुर भूषण यांनी किशोर कुमार आणि मधुबाला यांच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

मधुर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मधुबाला यांच्या बायोपिकमध्ये दिलीप कुमार आणि किशोर कुमार यांच्याशी संबंधित कोणत्याही गोष्टीचा उल्लेख असणार नसल्याचं म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, “मधुबाला यांची कथा मोठ्या पडद्यावर मांडताना कोणालाही दुःखी करण्याचा आमचा हेतू नाहीये. दिलीप कुमार आणि किशोर कुमार यांच्यासोबत मधुबाला याचं काय नातं होतं, हे नातं कसं होतं यावर आम्हाला बोलायचं नाही कारण आता त्यांचीही मुलं आहेत, कुटुंब आहे. प्रत्येक नात्यात चढ- उतार असतात. भूतकाळातील गोष्टी लोकांसमोर मांडल्या गेलेल्या दोन्ही अभिनेत्यांच्या कुटुंबांना आवडणार नाही.”

devendra fadnavis manoj jarange patil
‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
abdul karim tunda acquitted in 1993 serial blasts case
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडा निर्दोष मुक्त

आणखी वाचा- “बॉलिवूडमध्ये शरीरसंबंधांसाठी जबरदस्ती…” कास्टिंग काऊचवर नीना गुप्ता मांडलं होतं मत

अनेक मीडिया रिपोर्टमध्ये मधुबाला यांच्याशी लग्न करण्यासाठी किशोर कुमार यांनी आपला धर्म बदलला होता असा दावा करण्यात आला होता. यावर बोलताना मधुर भूषण म्हणाल्या, “हे खोटं आहे. किशोर कुमार यांनी कधीच आपला धर्म बदलला नव्हता. मी हे खूप लोकांकडून ऐकलं आहे की माझ्या बहिणीशी लग्न करण्यासाठी किशोर कुमार यांनी धर्म परिवर्तन केलं. पण यात अजिबात तथ्य नाही. ते हिंदू होते आणि एक हिंदू म्हणूनच त्यांचं निधन झालं. आमच्या कुटुंबातील मुलींशी लग्न करणाऱ्या कोणत्याही पुरुषाने आपला धर्म बदललेला नाही.”

आणखी वाचा- “आपल्याच गावी जाऊ शकत नसल्याचं दुःख…” उत्कर्ष शिंदेची पोस्ट चर्चेत

दरम्यान मधुबाला आणि दिलीप कुमाप एकमेकांसोबत जवळपास ९ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांचं लग्न होण्याआधीच हे नातं संपलं. त्यानंतर मधुबाला यांनी १९६० साली किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं. पण दोघंही काही वर्षंच एकमेकांसोबत राहू शकले. १९६९ साली वयाच्या ३६ व्या वर्षीच मधुबाला यांनी अखेरचा श्वास घेतला. या सगळ्यात जेव्हा मधुबाला आजारी होत्या त्यावेळी त्यांच्या अखेरच्या काळात किशोर कुमार यांनी त्यांना एकटं सोडलं होतं असा दावा देखील त्यावेळी काही मीडिया रिपोर्ट्सनी केला होता.