बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. माधुरी दीक्षितला बॉलिवूडची ‘डान्सिंग क्वीन’ देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर सोशल मीडियावर माधुरी दीक्षितच्या डान्स व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात झळकत आहेत. चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी माधुरी अनेकदा स्वतःचे डान्स व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिचा आणखी एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. यात बॉलिवूडची आणखी एक सुंदर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर तिच्यासोबत थिरकताना दिसून येतेय.

माधुरी दीक्षित आणि उर्मिला मातोंडकर यांचा हा डान्स व्हिडीओ कलर्स टीव्हीने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्मिलाच्या ‘मुझे प्यार हुआ अल्हामिया’ या प्रसिद्ध गाण्यावर या दोघी अभिनेत्रींचा अतिशय शानदार शैलीत डान्सचा जलवा पहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये दोघी अभिनेत्रींची डान्सची स्टाईल अतिशय जबरदस्त दिसून येतेय. हा व्हिडीओ डान्स रिअॅलिटी शो ‘डान्स दिवाने 3’ च्या सेटवरचा आहे. या शोमध्ये उर्मिला पाहुणी कलाकार म्हणून दिसली आहे.

A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण

आणखी वाचा : सिद्धार्थ आणि शेहनाजचा झाला होता साखरपुडा; येत्या डिसेंबरमध्ये करणार होते लग्न

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा : विद्युत जामवालचा नंदिता महतानीसोबत साखरपुडा? हातात अंगठी असलेला फोटो केला शेअर
माधुरी दीक्षित सध्या ‘डान्स दिवाने’ या शो मध्ये परिक्षण करताना दिसत आहे. शोच्या सेटवरील तिचे अनेक डान्स व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. माधुरी दीक्षित शेवटच्या दोन बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली होती. यात ‘कलंक’ आणि ‘टोटल धमाल’ या चित्रपटांचा समावेश आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये माधुरी दीक्षितची स्टाईल सर्वांनाच आवडली. आगामी काळातही माधुरी दीक्षित अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये झळकणारेय. तर उर्मिला सध्या चित्रपटांपासून दूर आहे. उर्मिला बऱ्याच काळानंतर एका रिअॅलिटी शोमध्ये दिसली आहे.