“मला तुझा खूप अभिमान आहे,” माधुरी दीक्षितने केले अमृता खानविलकरचे कौतुक

आता ती ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोचा भाग बनली आहे. या स्पर्धेत ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.

amruta madhuri

अभिनेत्री अमृता खानविलकर हे मराठी मनोरंजन विश्वातील एक महत्वाचं नाव. अनेक मालिका, चित्रपट तिच्या कसदार अभिनयाने गाजले आहेत. अभिनेत्रीबरोबरच अमृता एक उत्कृष्ट नर्तिका आहे, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. ‘वाजले की बारा’, ‘चंद्रा’ अशा अनेक गाण्यांना तिच्या सहजसुंदर नृत्याने सुशोभीत केले. तिची अनेक गाणी गाजली. तर आता ती ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोचा भाग बनली आहे. या स्पर्धेत ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. या शोच्या परीक्षकाच्या भूमिकेत अभिनेत्री मधुरी दीक्षित असते. सध्या या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. यात माधुरीने अमृतचे कौतुक केले असून अमृता खानविलकरची आई भावून झालेली पाहायला मिळत आहे. तर त्याचे कारण अमृताने सांगितले आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा : निर्मात्यांचे नुकसान भरून काढणार विजय देवरकोंडा, ‘लायगर’ चित्रपटाच्या अपयशानंतर घेतला मोठा निर्णय

काही दिवसांपूर्वी अमृताने माधुरी दीक्षितबरोबर डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. माधुरी दीक्षितला आपली प्रेरणा मानत नृत्य शिकणाऱ्या अमृताच्या त्या पोस्टचं नेटकऱ्यांनी कौतूकही केले होते. तर आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत अमृताची आई मधुरीला स्टेजवर येण्याची विनंती करत आहे. अमृता खानविलकरची आई माधुरीला उद्देशुन म्हणतात की, “माधुरी मॅम तुम्ही दोन मिनिटं वेळ काढून माझ्या मुलीसाठी स्टेजवर याल का? तुमच्याकडे पाहून ती सारं काही शिकली आहे. मी तुम्हाला असं बोलावणं योग्य नाही पण तरीही….यावर माधुरीही अमृताच्या आईच्या विनंतीला मान देत स्टेजवर आली. यावेळी अमृतानेही आपल्या आईविषयी दोन शब्द सांगितले आहे. “माझी आई आज एवढी भावूक का झाली आहे हे मला सांगायचे आहे,” असे म्हणत तिने याचे कारण सांगितले.

अमृता म्हणाली, “चार वर्षांची असताना पुण्यातील गणेशोत्वापासून मी नृत्य करण्यास सुरुवात केली, ती माधुरी यांच्या ‘आखिया मिलोओ कभी’ या गाण्यापासून. त्यानंतर दरवर्षी मी फक्त आणि फक्त माधुरी दीक्षित यांच्याच गाण्यांवर नृत्य करायचे. तेव्हापासून माधुरीजी माझ्या प्रेरणास्थान आहेत. आज माझ्यासारख्या मध्यमवर्गीय कुटूंबातील अनेक मुली अभिनेत्री आहेत. याचे श्रेय माधुरी दीक्षित यांनाच जातं.” असे म्हणून अमृताने माधुरीला नमस्कार करून तिचा आशीर्वादही घेतला. यावेळी अमृता देखील भावूक झाल्याचे दिसून आले आहे.

आणखी वाचा : ‘द फेम गेम’ सिरीजचा दुसरा सीझन नेटफ्लिक्स प्रदर्शित करणार नाही; कारण…

यावर माधुरीनं देखील प्रतिक्रिया दिली आहे. तिने अमृताने तोंडभरून कौतूक केले आहे. ती म्हणाली, “अमृता म्हणाली की, तिच्यासारख्या मुलींची मी प्रेरणास्थान आहे, मला बघून त्या या क्षेत्रात आल्या. मात्र या प्रवासात त्यांची मेहनत दुर्लक्षित करता येणार नाही. त्यात त्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे. त्यामुळे मला अमृताचा खूप अभिमान आहे.” माधुरीच्या या प्रतिक्रियेने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-09-2022 at 11:49 IST
Next Story
“माझ्या आयुष्यातल्या कित्येक चढ-उतारात…” सुबोध भावेसाठी अमृता सुभाषची खास पोस्ट
Exit mobile version