बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींचं नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा माधुरी दीक्षितचं नाव अव्वल स्थानावर येते. आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ‘धक धक गर्ल’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते. माधुरी दीक्षितने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटात काम केले आहे. पण माधुरीला सिनेसृष्टीत तिचे स्थान निर्माण करण्यासाठी फार संघर्ष करावा लागला. नुकतंच एका मुलाखतीत माधुरी दीक्षितने याबद्दलचा खुलासा केला आहे.

नुकतंच माधुरीने आरजे सिद्धार्थ काननला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत माधुरीने सिनेसृष्टीच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. यात तिने लोक तिच्या लूकची कशी खिल्ली उडवायचे, याबद्दल सांगितले आहे. ‘मी सिनसृष्टीत पदार्पण केल्यानंतर लोक मला काहीही बोलायचे’, असेही तिने यावेळी म्हटलं.

Raj Thackeray and anjali Damania
“ईडीचं चक्र होतं म्हणून…”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दर्शवल्यानंतर अंजली दमानियांचं मोठं विधान
Pankaja munde and jyoti mete
बीडमध्ये तिहेरी लढत? पंकजा मुंडेंसमोर आता ज्योती मेटेंचंही आव्हान; मविआनं डावलल्यानंतर म्हणाल्या, “पुढची पावलं…”
once man misbehaved with priya bapat (1)
प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”
Drunk with friends and the friend himself robbed house
नवी मुंबई : मित्रांसोबत मद्य घेतले आणि मित्रानेच घरात चोरी केली 

“त्यावेळी अनेक लोक मला सांगायचे की मी इतर अभिनेत्रींसारखी दिसत नाही. कारण माझे वय फार लहान आहे. मी मराठी कुटुंबातून आलेली आहे. मी दिसायला फार तरुण होती आणि त्यावेळी नायिका कशी असावी यावर लोकांची विचारधारा फार वेगळी होती”, असे माधुरीने सांगितले.

यापुढे माधुरी म्हणाली, “माझी आई खूप खंबीर स्त्री होती आणि ती नेहमी म्हणायची की जर तुम्ही चांगले काम केले तर तुम्हाला नक्कीच चांगली ओळख मिळेल. मी नेहमी तिचा सल्ला ऐकला आहे. त्यावेळी माझ्या आईने हे देखील म्हटले होते की, यशस्वी झाल्यानंतर लोक बाकी सर्व विसरतात. तिचे हे शब्द आजतागायत माझ्या आठवणीत आहेत.”

माधुरी दीक्षितने १९८४ मध्ये ‘अबोध’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ या चित्रपटातून माधुरीला खरी ओळख मिळाली. या चित्रपटात माधुरीसोबत अभिनेते अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. यानंतर माधुरीने साजन, दिल तेरा आशिक, बेटा, हम आपके है कौन, दिल तो पागल है, देवदास यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

“सर्व गर्लफ्रेंडर्सचे…”, लग्नाच्या ‘त्या’ प्रश्नावर सलमानने दिले हटके उत्तर

काही दिवसांपूर्वीच माधुरीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले. तिची पहिली वेब सिरीज ‘द फेम गेम’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. या मालिकेत तिच्यासोबत संजय कपूर, मानव कौल असे कलाकार झळकत आहेत.