आता माधुरी दीक्षित मुंबईत राहणार भाड्याच्या घरात; दर महिन्याला भाडं म्हणून देणार इतकी रक्कम

माधुरीचे हे घर २९व्या मजल्यावर आहे.

माधुरी दीक्षित, madhuri dixit, madhuri home, madhuri new house,

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या लग्झरी लाइफमुळे विशेष ओळखले जातात. त्यांच्या गाड्या, आलिशान घरे तसेच त्यांनी परिधान केलेले कपडे देखील कायम चर्चेत असतात. आता बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने मुंबईत एक अपार्टमेंट भाडे तत्वावर घेतले आहे. या अपार्टमेंटचे भाडे ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

Zapkey.comने दिलेल्या माहितीनुसार, माधुरीने मुंबईत अपार्टमेंट भाडे तत्वावर घेतले आहे. जवळपास तिन वर्षांसाठी माधुरीने हे घर घेतले आहे. मुंबईतील इंडियाबुल्स ब्ल्यूमध्ये हे अपार्टमेंट आहे. २९व्या मजल्यावर असलेल्या या अपार्टमेंटचे जवळपास १२.५ लाख रुपये भाडे आहे. हे अर्पाटमेंट ५५०० क्वेअर फीटमध्ये आहे.
२५० कोटींची मालकीण माधुरी दीक्षित राहत होती मुंबईतील आलिशान बंगल्यात, पाहा फोटो

या अपार्टमेंटसाठी माधुरीने जवळपास ३ कोटी रुपये डिपॉजिट म्हणून जमा केले आहेत. माधुरीच्या या अपार्टमेंटला जवळपास पाच कार पार्किंगची जागा देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी माधुरी ‘डान्स दीवाने’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत होती. तसेच तिने आलिया भट्ट आणि वरुण धावन स्टार ‘कलंक’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. ती अनिल कपूरसोबत ‘टोटल धमाल’ या चित्रपटात देखील दिसली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Madhuri dixit rents apartment in mumbai for 12 lakh rupees per month reports says avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या