बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आज १५ मे वाढदिवस आहे. माधुरी दीक्षितचे आजही लाखो चाहते आहेत. माधुरीने लग्न केले त्या दिवशी हजारो लोकांची स्वप्न ही तुटली. माधुरीने डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. मात्र, लक्ष वेधणारी गोष्ट ही आहे की लग्ना आधी माधुरीच्या लोकप्रियतेबद्दल श्रीराम यांना काही माहित नव्हते. कारण त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये आलेल्या कलाकारांना श्रीराम यांनी ओळखले नव्हते. माधुरीने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

माधुरीने ‘Rendezvous with Simi Garewal’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी माधुरीने अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. “मी आणि डॉक्टर नेनेंच्या आईने मिळून त्यांना माझे काही चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न केला होता. ते चित्रपट पाहताना डॉक्टर नेने म्हणायचे, आपण काही दुसरं करू शकत नाही का, चल बाहेर जाऊया आणि काही करूया”, असे माधुरी म्हणाली.

Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
82 year old CSK fan's tribute post for MS Dhoni wins internet
“मी धोनीसाठी आले आहे!”, ८२ वर्षीय आजीची सर्वत्र हवा! Viral Video एकदा बघाच
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
Sunita Kejriwal
‘केजरीवालांना आशीर्वाद द्या’; पत्नी सुनीता यांची व्हॉट्स अ‍ॅप मोहीम

आणखी वाचा : बाळासाहेबांचा मुलगा CM, ‘शिष्य’ शिंदे मंत्री, मुलगा खासदार पण आनंद दिघेंच्या…; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत

आणखी वाचा : Loksatta Exclusive : “…तर मग ती डीलीट नाही करायची”, प्राजक्ता माळीच्या राजकीय भूमिकेवर प्रसाद ओकने मांडलं परखड मत

माधुरी पुढे त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचा किस्सा सांगत म्हणाली, “मला वाटतं की त्यांनी फक्त अमिताभ यांनाच रिसेप्शनमध्ये ओळखलं होतं. जेव्हा ते शाळेत होते तेव्हा त्यांनी अमिताभ यांचा चित्रपट पाहिला होता आणि तो चित्रपट ‘अमर अकबर एंथॉनी’ होता. डॉक्टर नेने म्हणाले, मला असं वाटतंय की मी त्यांना ओळखतो. तेव्हा मी त्यांना म्हणाली, तुम्ही त्यांना चित्रपटामुळे ओळखत असाल.”

आणखी वाचा : ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या या गोष्टी माहित आहे का?

मात्र, डॉक्टर नेनेंनी इतर कोणत्याही कलाकाराला ओळखले नव्हते. याचे कारण म्हणजे त्यांनी कधीच हिंदी चित्रपट पाहिले नाही. लग्नाआधी माधूरी किती लोकप्रिय आहे, या विषयी त्यांना माहित नव्हते. ते दोघे पहिल्यांदा माधुरीच्या भावाच्या घरी भेटले होते. बरेच दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी १७ ऑक्टोबर १९९९ साली लग्न केले. त्यांना दोन मुलं आहेत. अरिन आणि रायान अशी त्यांच्या मुलांची नावं आहे.