scorecardresearch

कौतुकास्पद : माधुरीच्या मुलाने दोन वर्षे केस का वाढवले? व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

माधुरीने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

madhuri dixit, madhuri dixit younger son ryan,
माधुरीने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. माधुरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत माधुरी तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच माधुरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिचानसून तिच्या मुलाचा आहे.

माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत माधुरीचा लहान मुलगा रियान आहे. या व्हिडीओत रियान त्याचे केस कापताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत “सगळे हीरो टोपी घालत नाहीत…पण माझा हीरो घालतो. राष्ट्रीय कर्करोग दिनानिमित्त, मला खरोखर काही तरी खास सांगायच आहे”, असे माधुरी म्हणाली.

आणखी वाचा : फोटो बच्चन कुटुंबाचा पण चर्चा मात्र भिंतीवरच्या पेंटिंगची, किंमत ऐकलीत का?

पुढे माधुरी म्हणाली, “जेव्हा रियानने कर्करोग ग्रस्त लोकांना पाहिले तेव्हा त्याला वाईट वाटले. कारण केमोमधून जाताना त्या लोकांचे केस गळतात. माझ्या मुलाने त्याचे केस हे कर्करोग सोसायटीला दान करण्याचा निर्णय घेतला. आई-वडिलांच्या नात्याने त्याच्या या निर्णयाने आम्हाला आनंद झाला.”

आणखी वाचा : “पैसे टाकले म्हणून तिने राज कुंद्राशी लग्न केलं!”; अनिल कपूरच्या विधानावर शिल्पा शेट्टीने दिलं उत्तर, म्हणाली…

रियानने जवळपास २ वर्ष केस कापले नाही कारण त्याला कर्करोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना मदत करायची होती. याविषयी सांगताना माधुरी म्हणाली, “मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केसांची आवश्यक लांबी वाढण्यासाठी त्याला जवळजवळ २ वर्षे लागली आणि हा शेवटचा टप्पा होता. आज मला त्याच्या अभिमान आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-11-2021 at 10:23 IST

संबंधित बातम्या