महाराष्ट्रातील तमाम महिलांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे नाव घेतले जाते. गेल्या १८ वर्षांपासून अधिक काळ या कार्यक्रमाद्वारे तमाम वहिनींचा सत्कार आणि सन्मान केला आहे. झी मराठीवर होममिनिस्टर या कार्यक्रमाच्या महामिनिस्टर या नवीन पर्वाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या नवीन पर्वातील विजेत्या वहिनीला चक्क ११ लाखांची पैठणी भेट म्हणून मिळणार आहे. आज या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडणार असून विजेत्या वहिनींचं नाव जाहीर केलं जाणार आहे. मात्र त्याआधीच सोशल मीडियावर मात्र विजेत्या वहिनींचं नाव समोर आलं आहे.

झी मराठीवरील बहुचर्चित महामिनिस्टर शोचा महाअंतिम सोहळा आज संध्याकाळी ७ वाजता पार पडणार आहे. मागच्या महिन्याभरापासू महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना भेट देत सर्वांचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांनी महामिनिस्टरचा कार्यक्रम केला होता. या जिल्ह्यातून १२ जणींची महाअंतिम सोहळ्यासाठी निवड करण्यात आली आहे. या १२ जणींना प्रत्येकी एक लाखांची पैठणी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते आता महाअंतिम सोहळ्यात या १२ जणींमध्ये ११ लाखांच्या पैठणीसाठी चुरस रंगणार आहे.

Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 KKR vs RR and GT vs DC Games rescheduled
IPL 2024: आयपीएलच्या वेळापत्रकात दोन बदल, कोणत्या सामन्यांच्या तारखेत अदलाबदली; जाणून घ्या
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद
IPL 2024 Lucknow Super Giants vs Rajasthan Royals match sport news
तंदुरुस्त राहुलवरच लखनऊची भिस्त; ‘आयपीएल’मध्ये आज सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सशी सामना

अंतिम सोहळ्याचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वीच पार पडले होते पण विजेत्याचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. मात्र आता महामिनिस्टरच्या महाअंतिम सोहळ्याच्या विजेत्याचे नाव सोशल मीडियावर जाहीर करण्यात आले आहे. ११ लाखांची पैठणी मिळवण्याचा मान रत्नागिरीच्या लक्ष्मी मंदार ढेकणे यांनी पटकावल्याचं बोललं जात आहे. ११ लाखांची पैठणी नेसलेला त्यांचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे ही ११ लाखांची पैठणी रत्नागिरी केंद्राने पटकावलेली असल्याचा अंदाज लावला जात आहे. आता या विजेत्या वहिनींचे म्हणजेच लक्ष्मी ढेकणे यांच्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. मात्र झी मराठीकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आणखी वाचा- ‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीने सोडली मालिका? चर्चांना उधाण

दरम्यान झी मराठीने महिन्याभरापूर्वीच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत या ११ लाखांची पैठणीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया दाखवण्यात आली होती. या दोन मिनिटांच्या व्हिडीओत मागावर काम करणारे कलाकार, त्यांच्या लयबद्ध हालचाली आणि त्या मागाचा आवाज या सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या होत्या. या व्हिडीओला आदेश बांदेकर यांनी स्वत: निवेदन दिलं होतं. या पैठणीला अस्सल सोन्याची जर आणि हिरे असले तरी दिव्यांग कलाकारांनी ही पैठणी तयार केली आहे. त्यांच्या कौशल्यामुळे या पैठणीचं तेज आणखी वाढलं आहे.