maharahstrachi hasyjatra star vanita kharat shared post on dr babasaheb ambedkar mahaparinirvan din spg 93 | "भीमा तू होतास..." महापरिनिर्वाण दिनानिमित्त वनिता खरातची खास पोस्ट | Loksatta

“भीमा तू होतास…” महापरिनिर्वाण दिनानिमित्त वनिता खरातची खास पोस्ट

हास्यजत्रेतला कलाकार गौरव मोरेनेदेखील पोस्ट शेअर करत महामानवाला अभिवादन केले आहे

“भीमा तू होतास…” महापरिनिर्वाण दिनानिमित्त वनिता खरातची खास पोस्ट
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

अभिनेत्री वनिता खरात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नावारुपाला आली. वनिताने फक्त मराठी कार्यक्रम, चित्रपटांमध्येच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं. तिच्या विनोदी शैलीचे तर हजारो चाहते आहेत. वनिता सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन खास पोस्ट शेअर केली आहे.

६ डिसेंबर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत गौरवने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन केलं आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. या फोटोला तिने ‘भीमा तू होतास म्हणून आम्ही आहोत’ असं कॅप्शन तिने दिलं आहे.

समीर वानखेडेंचा चैत्यभूमीवरील अभिवादनाचा फोटो शेअर करत क्रांती रेडकर म्हणाली…

वनिताने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकरीदेखील अभिवादन करत आहेत. ‘विनम्र अभिवादन’, महामानवाला आदरांजली, जय भीमी अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तिच्याबरोबरीने हास्यजत्रेतला कलाकार गौरव मोरेनेदेखील पोस्ट शेअर करत महामानवाला अभिवादन केले आहे.

वनिता आता तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. आता वनिताची लगीन घाई सुरु झाली आहे. वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह फोटो शेअर करत आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. इतकंच नव्हे तर दिवाळी सणही या दोघांनी एकत्र साजरा केला. आता लवकरच ती सुमितबरोबर लग्न करणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 13:10 IST
Next Story
Video : “माझं काही चुकलं का?” प्रसाद ओकने ‘तो’ व्हिडीओ शेअर करत विचारला प्रश्न