scorecardresearch

“आता ‘राजी-नामा’ देतोय…”, अभिजित पानसे यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अभिजित पानसे आणि राजकारणातील ज्वलंत विषय हे एक समीकरणच आहे.

Abhijit Panse rajinama
अभिजित पानसे राजीनामा

सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात विविध घडामोडी घडताना दिसत आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय सत्तानाट्यावर पडदा पडला असला तरी राजकारण काही संपलेले दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनपेक्षित उलथापालथ पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आधारित एक नवी कोरी वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिजित पानसे दिग्दर्शित ‘राजी-नामा’ असे या वेबसीरिजचे नाव आहे. ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर ही वेबसीरिज झळकणार आहे.

अभिजित पानसे यांच्या ‘रानबाजार’ या वेबसीरिजला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या वेबसीरिजनंतर आता अभिजित पानसे आणि चिन्मय मांडलेकर ही जोडी ‘राजी-नामा’ ही वेबसीरिज प्रदर्शित करणार आहे. या वेबसीरिजची कथा प्रियम गांधी मोदी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावर आधारित आहे. ‘राजी-नामा’ वेबसिरीजची संकल्पना आणि लेखन चिन्मय मांडलेकर यांनी केलं आहे. या वेबसिरीजच्या निमित्ताने प्रेक्षकांना लवकरच एक राजकीय सनसनाटी विषय पाहायला मिळणार आहे.

“प्राजक्ता तू…”, ‘रानबाजार’ पाहिल्यानंतर कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

अभिजित पानसे यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या आगामी वेबसीरिजबद्दल आहे. महाराष्ट्रात ‘रानबाजार’ सुरूच आहे…आता “राजी-नामा” देतोय! प्रियम गांधी मोदी यांच्या ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावर आधारित, लवकरच फक्त ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर – “राजी-नामा” असे कॅप्शन अभिजित पानसे यांनी दिले आहे.

प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी प्रस्तुत ‘राजी-नामा’चे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षक या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. दरम्यान अभिजित पानसे आणि राजकारणातील ज्वलंत विषय हे एक समीकरणच आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रपटाचे विषय हे नेहमीच हटके असतात.

“मला अनेकदा जुलाब, उलट्या व्हायच्या”, प्राजक्ता माळीने सांगितला ‘रानबाजार’ च्या शूटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

आंतरराष्ट्रीय दर्जाचा आशय असलेल्या ‘रानबाजार’ला जगभरातील प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. यशोशिखरावर पोहोचलेल्या ‘रानबाजार’मधील सत्तानाट्यानंतर आता ‘राजी-नामा’मध्येही ‘खुर्ची’साठी चाललेले राजकीय युद्ध पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता हा ‘राजी-नामा’मंजूर झाल्यावर सत्ताचक्रं कशी फिरणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra political upheaval now on ott abhijit panse raji nama new webseries nrp

ताज्या बातम्या