महाराष्ट्र सदनात महर्षी वाल्मीकी जयंती साजरी

महर्षी वाल्मीकी यांची जयंती आज महाराष्ट्र सदन येथे साजरी करण्यात आली. कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, साहाय्यक निवासी आयुक्त प्रशासन यमुना जाधव, व्यवस्थापक अरुण कालगावकर उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र परिचय केंद्रात महर्षी वाल्मीकी यांना अभिवादन

sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
Sharad Pawar Wardha
रथातच बसणार… शरद पवारांचा हट्ट अन् नेत्यांची उडाली तारांबळ
andhshraddha nirmulan samiti latest news in marathi
नाशिक: महाराष्ट्र अंनिसतर्फे देहदान, अवयवदान सप्ताह

बाबा खडक सिंग मार्गस्थित महाराष्ट्र परिचय केंद्रात महर्षी वाल्मीकी यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. माहिती अधिकारी अंजू निमसकर-कांबळे, यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

बाल नाटय़ महोत्सव २०१५ (मदन बोबडे)

मुक्त संवाद आणि देवपुत्र यांचे संयुक्त आयोजन बाल नाटय़ महोत्सव २०१५ माई मंगेशकर सभागृहात संपन्न झाला. महोत्सवात इंदूर, उज्जन व धार येथील जवळजवळ ४०० पेक्षा अधिक बाल कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रभावित केले. विभिन्न सामाजिक, धार्मिक, पौराणिक व समसामायिक विषयांवर ३५ एकांकिका प्रस्तुत केल्या गेल्या. उद्घाटन मुख्य अतिथी मालिनी गौड, महापौर इंदूर नगर निगम यांनी केले. विशेष पाहुणे गोपाल मालू, प. पू. अण्णा महाराज उपस्थित होते. संचालन समीर पानसे व आभार मोहन रेडगांवकर यांनी मानले. संस्था परिचय मदन बोबडे यांनी दिला. हिंदी मराठी नाटकांबरोबर एक सन्मान समारोह आयोजित केला गेला. इंदूरचे दोन वरिष्ठ नाटय़कर्मी राजन देशमुख व डॉ. सुरेन्द्र जैन यांचा सन्मान, समारंभाचे प्रमुख पाहुणे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे भिडे फेम मंदार चांदवडकर यांच्या हस्ते झाला.

महाराणी लक्ष्मीबाई बलिदान दिवस साजरा (संजय तळवळकर)

महाराष्ट्रीय समिती (शहर) झाँसीतर्फे श्री गणेश मंदिरात ‘महाराणी लक्ष्मीबाई बलिदान’ दिवसाप्रीत्यर्थ दीपांजली अर्पित करण्यात आली. श्रीमती उल्का घाणेकर यांनी कवितेच्या माध्यमातून झाँसीच्या राणीचे शौर्य आणि बलिदानाचे महत्त्व सादर केले. त्याचबरोबर अन्य वक्त्यांनीही राणीच्या जीवनप्रसंगावर व्याख्यान केले. नंतर समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते महाराणीच्या चित्रासमोर दीप मालिकांची रांगोळी उभारण्यास आरंभ केला. समितीच्या सदस्यांच्या प्रयत्नाने मिळून एकूण १००० दिव्यांची मालिका प्रज्वलित करण्यात आली. कार्यक्रमात समितीचे समस्त पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित राहिले. शेवटी सचिव यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.

महाराष्ट्र समाज उज्जनची वार्षिक साधारण सभा (जयंत तेलंग)

महाराष्ट्र समाज उज्जनची वार्षिक साधारण सभा निर्विघ्न संपन्न झाली. समाजाचे अध्यक्ष सुभाष अमृतफळे आणि सचिव सुहास बक्षी यांनी आपले उद्बोधन आणि अहवाल वाचन करून समाजाची गतिविधी निर्माणकार्याच्या बाबतीत समाजबांधव आणि भगिनींना अवगत करवले. नंतर पुढे कार्य करण्यासाठी रु. ४५ लक्ष खर्च करण्याविषयी सर्वसंमतीने मंजुरी मिळविली. ज्या लोकांनी प्रश्न विचारले त्यांना समाधानपूर्वक उत्तरे देण्यात आली. सभासदांकडून समाजामध्ये झालेले निर्माणकार्य संतोषजनक आहे याचा पाठिंबा मिळाला. एकूण वार्षिक साधारण सभा निर्विघ्न संपन्न झाली. कोषाध्यक्ष जयंत तेलंग यांनी आय-व्यय पत्रक वाचले, पण ते इंग्लिशमध्ये होते त्याचा थोडा विरोध झाला, पण पुढच्या सभेमध्ये हे मराठीत छापले जाईल, हे आश्वासन अध्यक्ष महोदय यांनी दिल्यानंतर वाचन पूर्ण झाले. सभेची सर्वात मोठी उपलब्धी होती ती ही की बालकृष्ण देशमुख साहेबांनी आपल्या आई आणि

काकांच्या स्मृतीनिमित्त समाजाला रु. १ लक्ष ५०,०००ची देणगी आणि भूषण नाईक यांच्याकडून रु. ५०,००० ची देणगी समाजाला दिली. मोठय़ा संख्येत उपस्थित सभासद बंधू आणि भगिनींचे पण आभार मानले की त्यांनी कार्यकारिणीवर आपला विश्वास कायम ठेऊन आमच्या कार्याला पाठिंबा दिला.

विनम्र श्रद्धांजली.. (दिलीप कुंभोजकर)

बृहन्महाराष्ट्र मंडळाचा पूर्व कार्याध्यक्ष श्रीमती सुनिता काळे यांना दीर्घ आजारानंतर  दिल्ली येथे मागील महिन्यात देवाज्ञा झाली. सामाजिक क्षेत्रात उच्च व्यक्तिमत्त्वाच्या सद्गुणी सुनिता काळे वर्ष १९९६-२००० पर्यंतच्या कालावधीत मंडळाच्या कार्याध्यक्ष होत्या. जबलपूर येथे महाराष्ट्र समाज जबलपूर, दत्त भजन मंडळ, सांस्कृतिक संस्था रसरंगच्या माजी अध्यक्ष व महाराष्ट्र शिक्षक मंडळाच्या संचालक मंडळावर त्यांनी कार्य केले.

महाराष्ट्र समाज गांधीनगर (गुजरात)ची नवीन कार्यकारिणी

गांधीनगर, महाराष्ट्र समाज, गांधीनगर (गुजरात)च्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष सोमनाथ बाळाराम खांदारे, उपाध्यक्ष संतोष शरद मुळे, किशोर सदाशिव पंचाक्षरी, कार्यवाह चंद्रकांत रामजी कांबळे, सहकार्यवाह किरीट केशव कांबळे, सहकार्यवाह प्रकाश रघुनाथ विचारे, कोषाध्यक्ष सुभाषचंद्र लक्ष्मणराव लिमगावकर, सहकोषाध्यक्ष संदीप सखाराम पांगे, आंतरिक हिशोब तपासनीस जितेंद्र शरद वाघ व कार्यकारिणी सदस्य हृषीकेश वसंत देसाई, मुकेश अर्जुन बांदल, भीमराव श्यामराव कदम, दिवाकर मधुकर चौकेकर, प्रकाश विनायक घोणे, सूर्यकांत मधुकर बागवे, जयवंत ज्योतीराव चीवकोरडे, स्वप्ना जितेंद्र वाघ, सौमानसी आदित्य लिमगावकर, जितेंद्र दुर्गाराम गोंदकर, महेश बाळकृष्ण मारशेठवार, सुनील नामदेव नासरे निवडून आले. ही कार्यकारिणी पाच वर्षांकरिता (वर्ष २०१५-२०१९) राहील.

– रेखा गणेश दिघे
rekhagdighe@gmail.com