‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर येणार करोडोंचे आवडते हास्यवीर

सचिन मोटे, सचिन गोस्वामी, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले हे विनोदवीर हजेरी लावणार आहेत.

maharashtrachi hasya jatra, kon honar marathi crorpati, kon honar marathi crorpati update,

सोनी मराठी वाहिनीवरील हास्यजत्रेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. आपल्या विनोदाने करोनाच्या कठीण काळात सुद्धा प्रेक्षकांचं मनोरंजन करून त्यांना हास्यथेरपी दिली. या विनोदवीरांची ही हास्यजत्रा संपूर्ण महाराष्ट्राच्या टेन्शनवरची मात्रा ठरली आणि आता हे करोडोंचे आवडते हास्यवीर येणार आहेत कोण होणार करोडपती विशेष भागात ७ ऑगस्टला.

आपले समाजाप्रती कर्तव्य जाणून हास्यजत्रेची टीम ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर आली आहे. सचिन मोटे, सचिन गोस्वामी, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि समीर चौघुले हे विनोदवीर लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूणसाठी खेळणार आहेत.

जुलै महिन्यात आलेल्या महाभयंकर पुरानं लोकमान्य टिळक स्मारक हे मंदिर उद्ध्वस्त केलं आहे. हे संग्रहालय आणि ग्रंथालय जिद्दीनं पुन्हा उभं करता यावं यासाठी हे विनोदवीर ज्ञानाचा हा खेळ खेळणार आहे.

या शनिवारी कोण होणार करोडपती विशेष भाग होणार असून त्यात हास्यकलाकार हॉटसीटवर खेळणार आहेत. मंचावर प्रसाद आणि समीर यांनी त्यांच्याबरोबर घडलेले काही विनोदी किस्से सांगितले तर समीर-विशाखा यांनी जाऊया गप्पांच्या गावाचं छोटंसं सादरीकरण देखील करून दाखवलं. यावेळी सचिन खेडेकर यांना देखील हसू अनावर झालं आणि त्यांनी या हास्यथेरपीचा आनंद घेतला.

नम्रताने यावेळी एक गाणं सादर केलं. हास्यजत्रेच्या कलाकारांच्या मंचावर येण्याने कोण होणार करोडपतीच्या मंचाला वेगळाच रंग चढला होता. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण यांना मदतीचा हात म्हणून हास्यकलाकार कोण होणार करोडपतीच्या मंचावर आले. इथे जिंकलेली रक्कम ही लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण याच्या पुनरुभारणीसाठी वापरण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtrachi hasya jatra contestant participated in kon honar marathi crorpati avb

ताज्या बातम्या