अभिनेता प्रसाद खांडेकर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात पोहोचला.  विनोदबुद्धी आणि अभिनय कौशल्याने तो प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतो. आता प्रसाद त्याच्या नवीन प्रवसाला सुरुवात करत आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा प्रसाद रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

प्रसाद खांडेकर लवकरच नवीन मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘एकदा येऊन तर बघा…रिटर्न जाणारच नाही’, असं त्याच्या चित्रपटाचं नाव आहे. अभिनेता असण्याबरोबरच प्रसाद उत्तम लेखक आणि दिग्दर्शकही आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधील अनेक स्किटचे लेखन तो करत असतो. त्याच्या नवीन चित्रपटाचे लेखनही त्यानेच केले आहे. प्रसाद खांडेकर लिखित दिग्दर्शित चित्रपट पाहायला मिळणार असल्याने चाहतेही खूश झाले आहेत.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

हेही वाचा >> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ओंकार भोजनेचं नशीब उजळलं, एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणार

प्रसादने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाचं पोस्टर शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. “मोरया. नवीन प्रवास…नवीन सुरुवात, नवी ऊर्जा…नवा उत्साह. माझा पहिला लिखित आणि दिग्दर्शित सिनेमा ‘एकदा येऊन तर बघा…रिटर्न जाणारच नाही’! A FILM BY PRASAD MAHADEV KHANDEKAR. या नव्या प्रवासातसुद्धा प्रेम आणि आशीर्वाद द्याल हा विश्वास आहे”, असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा >> “देखो जरा अपनी मोहब्बत से दूर…”, उर्वशी रौतेलाची नवी पोस्ट पाहून नेटकऱ्यांना आठवला ऋषभ पंत

हेही वाचा >> ‘धर्मवीर’नंतर प्रसाद ओकची मोठी घोषणा; ‘या’ सुप्रसिद्ध कलाकारांना घेऊन नव्या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार

विनोदाची डबलडेकर प्रसाद खांडेकरला त्याच्या नवीन प्रवासासाठी चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसादच्या या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे, गिरिश कुलकर्णी, भाऊ कदम, राजेश शिरसाटकर हे कलाकार दिसणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री तेजस्विनी पंडितही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील विनोदवीरही चित्रपटात झळकणार आहेत. नम्रता संभेराव, वनिता खरात, ओंकार भोजने, गौरव मोरे आणि पंढरीनाथ कांबळे हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत.