‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक घेत गौरव मोरे लंडनला रवाना, पोस्ट शेअर करत म्हणाला, "खूप भारी..." | maharashtrachi hasyajatra fem gaurav more in london with bharat jadhav for marathi movie shoot see details | Loksatta

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक घेत गौरव मोरे लंडनला रवाना, पोस्ट शेअर करत म्हणाला, “खूप भारी…”

आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गौरव मोरे लंडनला रवाना झाला आहे. यादरम्यान त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक घेत गौरव मोरे लंडनला रवाना, पोस्ट शेअर करत म्हणाला, “खूप भारी…”
आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गौरव मोरे लंडनला रवाना झाला आहे. यादरम्यान त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे गौरव मोरेला एक वेगळीच ओळख मिळाली. तो आता मराठी चित्रपटांसह जाहिरातींमध्येही काम करत आहे. त्याचा नवा मराठी चित्रपट ‘हवाहवाई’मुळे तो सध्या चर्चेत आहे. गौरव आपल्या करिअरमध्ये एक एक पाऊल पुढे टाकत आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा विनोदी कलाकार आता लंडनला जाण्यासाठी सज्ज झाला आहे. मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्याबरोबर आपण लंडनला जात असल्याचं गौरवने पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.

आणखी वाचा – लग्नानंतरही सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर सनी देओलचं सुरु होतं अफेअर, पत्नीला सत्य समजलं अन्…

गौरव मोरेची पोस्ट चर्चेत

गौरव सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सह मराठी चित्रपटामध्ये काम करण्यात व्यग्र आहे. आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तो लंडनला निघाला आहे. याबाबत त्याने खास पोस्ट शेअर करत माहिती दिली. तसेच त्याने अभिनेता भरत जाधवसह फोटो शेअर केला आहे. भरत जाधवबरोबर तो आता चित्रपट करणार असल्याचं या पोस्टवरून सिद्ध होतं.

गौरव म्हणाला, “मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भरत जाधव सरांबरोबर लंडनला निघालो आहे. खूप उत्सुकता आहे. तसंच खूप भारी वाटत आहे. ज्यांना मी बाल्कनीमधून बघितलं आहे त्यांच्याबरोबर मी आज प्रवास करत आहे. लवकरच भेटूया…” गौरवला मराठीमधील आघाडीच्या अभिनेत्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. पण या चित्रपट नेमका कोणता आहे? याबाबत गौरवने बोलणं टाळलं आहे.

आणखी वाचा – मध्यरात्री दारूच्या नशेमध्ये सलमान ऐश्वर्याच्या घराबाहेर पोहोचला अन्…; ‘त्या’ एका घटनेमुळे अभिनेत्रीला झाला होता मनस्ताप

गौरवने मुंबई विमानताळवरच भरत जाधवबरोबर फोटो काढला. आपण लंडनला जात असल्याचं इन्स्टाग्रामद्वारे त्याने सांगितलं आणि त्याच्या फोटोवर कमेंटचा वर्षाव होऊ लागला. अनेक सेलिब्रिटी मंडळींनी त्याच्या या फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे. “ओहहह…” अशी कमेंट सई ताम्हणकरने केली आहे. तसेच नव्या चित्रपटासाठी गौरवला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-09-2022 at 14:11 IST
Next Story
“काल मला माझी दुर्गा भेटली…” हेमांगी कवीने ‘या’ अभिनेत्रीसाठी केलेली खास पोस्ट चर्चेत