अभिमानास्पद! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील दत्तू मोरेच्या ठाण्यातील चाळीला दिलं त्याचच नाव, अभिनेता म्हणतो…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामधील कलाकार दत्तू मोरे राहत असलेल्या चाळीला त्याचंच नाव देण्यात आलं आहे.

अभिमानास्पद! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील दत्तू मोरेच्या ठाण्यातील चाळीला दिलं त्याचच नाव, अभिनेता म्हणतो…
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमामधील कलाकार दत्तू मोरे राहत असलेल्या चाळीला त्याचंच नाव देण्यात आलं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमामधील कलाकार दत्तू मोरे राहत असलेल्या चाळीला त्याचंच नाव देण्यात आलं आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम लवकरच पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आपल्या भन्नाट विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची ताकद या कार्यक्रमामध्ये आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे कार्यक्रमामधील काही विनोदवीरांचं तर नशिबच बदललं. त्यातीलच एक विनोदवीर म्हणजे दत्ता मोरे म्हणजेच सगळ्यांचा लाडका दत्तू मोरे. दत्तूच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला आणि त्यामुळे तो अगदी भारावून गेला आहे.

आणखी वाचा – Photos : अमृता फडणवीस यांचा नवा लूक, लंडन दौऱ्यादरम्यान केलं खास फोटोशूट

दत्तूचा सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला. दत्तू ठाण्यामधील वागळे इस्टेट रामनगर परिसरातील चाळीत लहानाचा मोठा झाला. त्याच्या चाळीतील मंडळींना तसेच ठाणेकरांना दत्तूचा खूप अभिमान वाटतो. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे दत्तू राहत असलेल्या चाळीला ‘दत्तू चाळ’ असं नाव देण्यात आलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये दत्तूने हा संपूर्ण प्रसंग सांगितला. या गोष्टीमुळे दत्तू खूपच भारावून गेला आहे.

“मी राहत असलेल्या चाळीला याआधी कोणतंच नाव नव्हतं. चाळ कुठे आहे हे सांगायचं झालं तर आजूबाजूला असलेल्या एखाद्या ठिकाणावरुन ते सांगावं लागायचं. पण आता हिच चाळ माझ्या नावाने ओळखली जाणार असल्याचं ऐकून खूप छान वाटत आहे.” असं दत्तू याने या मुलाखतीदरम्यान सांगितलं. शिवाय त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमचे आभार देखील मानले.

आणखी वाचा – VIDEO : ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीबाबत भलतंच बोलून गेली आलिया भट्ट, व्हिडीओ व्हायरल

दत्तू म्हणाला, “माझ्यासाठी खरं तर ही फार मोठी गोष्ट आहे. आमच्या नगरातील खासकरुन चाळीतल्या लोकांचं माझ्यावर वेगळंच प्रेम आहे. या सगळ्यांचा मी फार ऋणी राहीन, ज्यांनी आजपर्यंत मला एवढं प्रेम दिलं, कौतुकाची थाप दिली त्यांनी असंच प्रेम करत राहा. तुमच्या प्रेमामुळे एक वेगळीच उर्जा मिळते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा यामध्ये फार मोठा वाटा आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कुटुंबाचा, सोनी मराठी वाहिनीचे मी यासाठी आभार मानतो.” दत्तूच्या कामाची ही पोचपावती आहे असं म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasyajatra sony marathi show actor dattu more name was given to his chawl in thane kmd

Next Story
VIDEO: आलिया प्रेग्नंट, फोटोग्राफर्सकडून रणबीरला शुभेच्छा; अभिनेत्याची प्रतिक्रिया चर्चेत
फोटो गॅलरी