scorecardresearch

अल्लू अर्जुन पाठोपाठ महेश बाबूचा ‘हा’ चित्रपट होणार हिंदीमध्ये प्रदर्शित?

पुष्पा चित्रपटाची कमाई पाहाता निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ पाहायला मिळते. प्रभासच्या बाहुबली चित्रपटानंतर केजीएफ आणि आता त्या पाठोपाठ अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला. या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. लवकरच अल्लू अर्जुनचा ‘अला वैकुंठपुरमलो’ हा चित्रपट देखील पुन्हा हिंदीमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. त्यानंतर आता आणखी एका दाक्षिणात्य सुपरस्टारचा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सुपरस्टार महेश बाबू देखील आता हिंदीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा ‘सरकारु वारी पाटा’ हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. त्यासाठी ते तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्माते महेश बाबूचा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी करत आहेत.
आणखी वाचा : आई अमृता सिंहच्या ‘त्या’ सीनमुळे साराला वाटत होती लाज, सैफला याबाबत सांगताच…

महेश बाबू हा अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याच्या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. अल्लू अर्जुन पाठोपाठ आता महेश बाबूचा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित होणार असल्यामुळे चाहते फार आनंदी आहेत. पण निर्मात्यांकडून अद्याप या चित्रपटाबाबत कोणतीही अधिकृत घोषण करण्यात आलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahesh babu follow allu arjuns pushpa strategy for sarkaaru vari paata avb

ताज्या बातम्या