दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचे आज (२८ सप्टेंबर) निधन झाले आहे. त्या ७० वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून हैद्राबादमधील एआयजी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महेश बाबू यांच्या आईच्या निधनानंतर दाक्षिणेतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. महेश बाबूचा आईच्या अंत्यसंस्कारादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हैद्राबाद येथील पद्मालय स्टुडिओ येथे इंदिरा देवी यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. इंदिरा देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गज दाक्षिणात्य कलाकार उपस्थित होते. विजय देवरकोंडा, राणा दग्गुबती, नागार्जुन, अदिवी शेष यांसारखे कलाकार यावेळी इंदिरा देवी यांच्या अंतिम संस्कारासाठी पोहोचले. यावेळी महेश बाबूला अश्रू अनावर झाले.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
rohit pawar slams ram kadam ashish shelar
“सभागृहात अ‍ॅक्टिंग कशाला करताय? होय, आहे योगेश सावंत आमचा कार्यकर्ता”, रोहित पवारांचा राम कदमांवर हल्लाबोल!
Kamal Nath
“…तर मी काँग्रेसमधून बाहेर पडेन”, कमलनाथांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली भूमिका
girish mahajan manoj jarange
“मनोज जरांगेंना माफी नाही, त्यांनी आता…”, गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”

पाहा व्हिडीओ

आपल्या आईला अखेरचा निरोप देताना महेश बाबू भावुक झाल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. त्याचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इंदिरा देवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा – दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांच्या आईचे निधन

महेश बाबू यांचे वडील आणि सुपरस्टार कृष्णा गारु यांनी दुसरं लग्न केलं होतं. इंदिरा देवी या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. कृष्णा गारु यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर त्या एकट्याच राहत होत्या. महेश बाबू यांच्या अनेक कार्यक्रमात इंदिरा देवी आवर्जून उपस्थित असायच्या. कृष्णा गारु आणि इंदिरा देवी यांचा महेश बाबू हा चौथा मुलगा आहे. महेश बाबूचा भाऊ निर्माते रमेश बाबू यांचंही याच वर्षाच्या सुरुवातीला निधन झालं.