scorecardresearch

आईच्या निधनानंतर महेश बाबूंनी शेअर केला जुना फोटो, कॅप्शन चर्चेत

त्यांनी नुकतंच आईसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

आईच्या निधनानंतर महेश बाबूंनी शेअर केला जुना फोटो, कॅप्शन चर्चेत

अभिनेता महेश बाबू यांची आई इंदिरा देवी यांचे निधन झाले आहे. हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या निधनानंतर महेश बाबू हे प्रचंड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी नुकतंच आईसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

महेश बाबू हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. आईच्या निधनानंतर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी आईचा फार पूर्वीचा फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी काहीही न बोलता आपल्या आईवरील प्रेम व्यक्त केले आहे. त्यात त्यांनी काळ्या रंगाचे तीन हार्ट इमोजी शेअर केले आहेत.
आणखी वाचा : “मी तुमच्या मुलावर….” सासूबाईंच्या निधनानंतर नम्रता शिरोडकरची भावूक पोस्ट

महेश बाबूची पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “आम्हाला तुमची खूप आठवण येईल… तुम्ही दिलेले प्रेम आणि आठवणी आमच्याबरोबर कायम असतील. मी तुमच्या मुलावर, नातवंडांवर आणि कुटुंबावर कायम प्रेमाचा वर्षाव करेन. आई…माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. ते प्रेम असेच अखंड राहिल”, असे नम्रता शिरोडकरने म्हटले. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

दरम्यान महेश बाबू यांची आई वृद्धपकाळामुळे अनेक आजारांशी झुंज देत होती. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र बुधवार (२८ सप्टेंबर) सकाळी ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

आणखी वाचा : दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांच्या आईचे निधन

महेश बाबू यांचे वडील आणि सुपरस्टार कृष्णा गारु यांनी दुसरे लग्न केले होते. इंदिरा देवी या त्यांच्या पहिल्या पत्नी होत्या. पतीपासून विभक्त झाल्यानंतर इंदिरा देवी या एकट्याच राहत होत्या. पण महेश बाबू आणि इतर कुटुंबीय त्यांच्याकडे वारंवार जात-येत असत. महेश बाबू यांच्या अनेक कार्यक्रमात त्यांची आई इंदिरा देवी सहभागी व्हायच्या. त्यांच्या फार घट्ट नाते होते. महेश बाबू हे कृष्णा गारु आणि इंदिरा देवी यांचे चौथे अपत्य आहेत. महेश बाबू यांचे भाऊ रमेश बाबू यांचेही यंदाचं प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या