२००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दे धक्का’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम या त्रिकुटाने पहिल्या भागात केलेली हीच धमाल मस्ती प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. मनोरंजनाचा डबल डोस घेऊन ‘दे धक्का २’ चित्रपट आज शुक्रवारी (५ ऑगस्ट) पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने ‘दे धक्का २’ चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी शूटींगदरम्यान सिद्धार्थ जाधवच्या शॉपिंगवरुन एक रंजक किस्सा घडला होता. त्यावरुन महेश मांजरेकर हे सिद्धार्थवर संतापले होते.

‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’दरम्यान अभिनेते मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, गौरी इंगवले, सक्षम कुलकर्णी यांनी चित्रपटाबद्दल मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी त्यांना लंडनमध्ये शूटींगदरम्यान सिद्धार्थ जाधवच्या शॉपिंगवरुन एक रंजक किस्सा घडला होता? याबद्दल विचारणा केली होती. त्यावेळी मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांनी हा किस्सा नेमका काय? हे सांगितले.

siddharth chandekar shares post for chinmay mandlekar
“जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत…”, सिद्धार्थ चांदेकर ट्रोलर्सवर संतापला; चिन्मय मांडलेकरला केली विनंती
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
siddharth opens up about secret engagement with aditi rao hydari
अदिती राव हैदरीशी सिद्धार्थ कधी करणार लग्न? गुपचूप साखरपुडा उरकल्यावर अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला, “याचा निर्णय…”
aadesh bandekar reaction on shree siddhivinayak temple trust
“मी भत्ता घेणार नाही, एक लाडू घेतला तरी…”, सिद्धिविनायक मंदिराच्या वादावर आदेश बांदेकरांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले…

Video: लंडन दौरा, १२ अंडी, शॉपिंग अन् बरंच काही… ‘दे धक्का २’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमबरोबर दिलखुलास गप्पा

यावर उत्तर देताना मकरंद अनासपुरे म्हणाले, “त्यावेळी आमच्या चित्रपटाच्या शूटींगचा सेट रस्त्यावर लागलेला होता. सिद्धार्थ जाधवला एक फार छान सवय आहे. तो आल्यानंतर दिग्दर्शकाच्या पाया वैगरे पडतो. त्यावेळी शॉट लागलेला होता. त्यानंतर महेश मांजरेकर सिद्धार्थला म्हणतात, अरे सिद्ध्या…सिद्ध्याचं नाही आणि मग नंतर लक्षात आलं सक्षमही नाही. मग शोधाशोध, पळापळ सुरु झाली. सिद्धार्थचा फोनही लागत नव्हता.”

“त्यावेळी आमचा सहकारी राजू राणे नावाचा एक मित्र आहे. तो मॉलमध्ये गेला, त्यावेळी सिद्धार्थ हा सक्षमला शूज दाखवत होता. हे कसं वाटतं, ते कसं वाटतंय, असं तो विचारत होता. यानंतर राजू दादा त्याला घेऊन आले. ते दोघेही शॉपिंगच्या बॅगा घेऊन शूटींगच्या सेटजवळ आले. यावेळी गर्दीत सिद्धार्थला महेश मांजरेकर दिसले तेव्हा तो हातातल्या बॅगा टाकून तिथे पळत आला आणि त्यानंतर महेश सर खूप भडकून म्हणाले ‘मी बंद करु का चित्रपट. शूटींग बंद करतोय मी….’ आणि त्यानंतर सिद्धार्थने कधीही खरेदी केली नाही.” असे मकरंद अनासपुरेंनी सांगितले.

हा किस्सा सांगताना अभिनेते शिवाजी साटम यांनी महेश मांजरेकर सिद्धार्थ जाधवला ओरडत असतानाचा एक फोटोही दाखवला. त्या फोटोत सिद्धार्थ हा शांतपणे उभा राहून महेश मांजरेकरांचा ओरडा खात असल्याचे दिसत आहे. यानंतर सिद्धार्थने तिथे खरेदी केलेले ते शूज सर्वांना दाखवले.

De Dhakka 2 Trailer : जबरदस्त डायलॉग, मनोरंजन आणि कॉमेडीचा तडका, ‘दे धक्का २’ चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

सिद्धार्थ जाधव काय म्हणाला?

“कॉस्को कंपनीचे एक शूज आहेत जे फार मस्त मिळतात. मला शूज आणि सनग्लासेसची प्रचंड आवड आहे. मला महेश सरांनी कुठे चांगले टिकाऊ शूज मिळतात याबद्दल सांगितले होते. त्यावेळी त्यांनी आम्हाला टी के मॅक्स नावाचा एक मॉल सांगितला होता. तिकडे जगभरातील शूज मिळतात. मी एक शूज हेरुन ठेवले होते. मला ते घ्यायचे होते.

शूटींगच्या दिवशी इतर काही कलाकार यायचे होते. म्हणून थोडा वेळ लागणार होता. त्यावेळी मी सक्षमला म्हटलं टी के मॅक्स इथे बाजूलाच आहे, आपण पटकन जाऊन ते घेऊन येऊ. त्यावेळी आम्ही राजू दादांना सांगून गेलो होती की सर आले की मला फोन करा. आम्ही शूज आणायला गेलो पण तिकडे बेसमेंटला असल्याने नेटवर्क नव्हतं. आम्ही ते शूज घेतले आणि बिलिंग करुन निघालो.

आम्ही रस्त्यातून चालत येत असताना वाटेत राजू दादा भेटले. त्यानंतर आम्ही धावत तिकडे गेलो. त्यावेळी मी लांबूनच महेश सरांना भडकलेले असल्याचे बघितले. त्यानंतर मी रस्त्यातच शूजची बॅग टाकून दिली आणि पळत गेलो. पण सर मला काहीही बोलले नाही, पण सक्षमवर भडकले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही हॉटेलवरुन निघालो तेव्हा रस्त्यात एक टी. के. मॅक्स होतं. त्यावेळी सर्वजण खाली शॉपिंग करण्यासाठी उतरले. मी गाडीत बसून होतो, असा किस्सा सिद्धार्थने सांगितला.

दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केलं आहे. तसेच अमेय खोपकर यांच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दे धक्का २ हा चित्रपट आज (५ ऑगस्ट) संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.