“Same to same…”, ‘बिग बॉस मराठी ३’ मधील महेश मांजरेकरांचा लूक पाहून नेटकऱ्यांना आठवले छगन भुजबळ

महेश मांजरेकर हे ‘बिग बॉस मराठी ३’चे सुत्रसंचालन करत आहेत.

mahesh manjrekar, chhagan bhujbal,
महेश मांजरेकर हे 'बिग बॉस मराठी ३'चे सुत्रसंचालन करत आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा लोकप्रिय आणि बहुचर्चित असलेला शो आहे. यंदाचे शोचे ३ पर्व सुरु आहे. या शोमध्ये असणारे स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, या वेळी शोचे सुत्रसंचालन करणारे अभिनेते महेश मांजरेकर चर्चेत आले आहेत. सध्या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी महेश मांजरेकर यांची तुलना ही नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी केली आहे.

सध्या व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर मीरा जगन्नाथची शाळा घेत तिला चांगलचं सुनावल्याचे दिसत आहे. पहिल्या दिवसापासूनच मीराने घरात भांडण करण्यास सुरुवात केली असून मीरा अनेक ठिकाणी चुकल्याचं महेश मांजरेकर म्हणाले. यावेळी स्पष्टीकरण देण्यासाठी मीराने प्रयत्न केला मात्र संतापलेल्या महेश मांजरेकरांनी तिला “तू आधी ऐकायला शिक” म्हणत मीराची बोलती बंद केली.

आणखी वाचा : ‘इन्स्पेक्टर साहेब बसले आहेत आणि एसपी साहेब…’, अक्षयच्या पोस्टवर कमेंट करत पोलिस अधिकाऱ्यांनी केले ट्रोल

mahesh manjrekar, chhagan bhujbal, bigg boss marathi 3,
व्हायरल झालेला प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट करत महेश मांजरेकर यांची तुलना ही छगन भुजबळ यांच्याशी केली आहे.

आणखी वाचा : नागा चैतन्यच्या ‘पहिल्या पत्नी’ विषयी समांथाने केला होता खुलासा

हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी महेश यांची तुलना छगन भुजबळ यांच्याशी केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “मला वाटलं भुजबळ च आहे की काय.” दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मला वाटलं छगन भुजबळ इकडे कसे काय.” तिसरा नेटकरी म्हणाला, “Same to same छगन भुजबळ साहेब.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “आम्ही तर भुजबळ साहेबांना बघायला आलो.” दुसरा नेटकरी म्हणाला, “मला वाटलं भुजबळ च आहे की काय.” तिसरा नेटकरी म्हणाला, “मला वाटले छगन भुजबळच आलेत होस्ट म्हणून!” अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी महेश यांची तुलना छगन भुजबळ यांच्याशी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mahesh manjrekar is looking like chhagan bhujbal in bigg boss marathi 3 netizens says same to same dcp

ताज्या बातम्या