सलमान खान आणि आयुष शर्मा यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट त्याचबरोबर मराठी बिगबॉस यामुळे गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक महेश मांजरेकर चांगलेच चर्चेत आहेत. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी त्यांच्याविषयी चर्चा होण्याचं कारण ठरलं आहे त्यांचं एक ट्वीट आणि त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ.

या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे ट्वीट केलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत १८ वर्षांवरील प्रेक्षकांना आव्हान देण्यात आलं आहे. या व्हिडीओत म्हटलं आहे की, १८ वर्षांवरील प्रेक्षकहो, दम असेल तरच थेटरात येऊन पाहायचं. त्यानंतर लगेचच खाली नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा अशी अक्षरं येत आहेत, त्यासोबतच खाली २१ जानेवारी २०२२ ही तारीखही दिसत आहे.

या व्हिडीओसोबत केलेल्या ट्वीटमध्ये महेश मांजरेकर म्हणतात, “चाळी झाल्या रे सपाट, टॉवरचा थाटमाट, शांघायच्या स्वप्नामधून आता डोळे जागले , कवल्या कवल्या जिंदगीला लंबे लंबे लागले ..लेखक – जयंत पवार, दिग्दर्शक – महेश मांजरेकर, नाय वरणभात लोन्चा कोन नाय कोन्चा…२१ जानेवारी, २०२२ पासून आपल्या जवळच्या थेटरात”.

आता यावरुन हा महेश मांजरेकरांचा नवा चित्रपट असणार याचा अंदाज प्रेक्षकांना आलेलाच असावा. पण हा चित्रपट नेमका कशा पद्धतीचा असणार आहे, व्हिडीओत दाखवल्यावरुन तर हा एखादा थ्रिलर चित्रपट आहे की काय असंच प्रेक्षकांना वाटत आहे. शेवटी या व्हिडीओचा आणि या ट्वीटचा उलगडा व्हिडीओत नमूद केल्याप्रमाणे २१ जानेवारी २०२२ लाच होईल असं दिसत आहे.