“२०० बिहारी इथे उभे करीन…”, घरातल्याच कूकने पोटात चाकू खुपसण्याची अभिनेत्रीला दिली धमकी

अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

“२०० बिहारी इथे उभे करीन…”, घरातल्याच कूकने पोटात चाकू खुपसण्याची अभिनेत्रीला दिली धमकी
अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री माही विज ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच माही विजने सोशल मीडिया अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिच्या घरातील आचारीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याचा पुरवा असल्याचेही माहीने सांगितले. याविषयी माहीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.

आणखी वाचा : उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर रितेश देशमुखची पोस्ट चर्चेत, म्हणाला…

माहीने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली होती. यावेळी माहीने सांगितले की, तिच्या मुलीला सांभाळणाऱ्या नॅनीने तिला त्या कुकविषयी आधीचं सांगितलं होतं. माही म्हणाली, “त्या कूकला कामाला येऊन फक्त तीन दिवस झाले होते, तेव्हाच नॅनीने आम्हाला त्या कुकने केलेल्या चोरीविषयी सांगून जागरूक केलं. मी हे जयला सांगण्याचं ठरवलं. जेव्हा जय आला तेव्हा त्याला मी हे सगळं सांगितलं. त्यानंतर जयने त्या कुकचे ३ दिवसाचे पैसे दिले आणि तू आता जा असे सांगितले. पण तो पूर्ण महिन्याचे पैसे मागे लागू लागला. जेव्हा जयने त्याला कामावरुन काढून टाकण्याचं कारण सांगितलं तेव्हा तो म्हणाला, “२०० बिहारी इथे उभे करीन”. त्याने मद्यपान केले आणि त्याने शिवीगाळ केला. आम्ही याची तक्रार पोलिसांत केली होती.”

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का

माही पुढे म्हणाली, “त्या माणसाने कामावरुन काढल्यानंतरही फोन करुन आम्हाला धमक्या देणं सुरू ठेवलं होतं. माझ्या जवळ त्याचे रेकॉर्डिंग देखील आहेत असे तिने सांगिलते. आजकाल आजुबाजूला जे घडतंय, ते पाहिल्यावर मग भीती वाटू लागते. जर त्याने खरंच त्याने माझ्या पोटात चाकू खूपसला तर? मला काही झाल्यावर लोक येतील आणि माझ्यासाठी आवाज उठवतील, पण त्याचा फायदा काय? मी माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी काळजीत आहे. मला कळलंय की तो जामिनावर सुटेल. मला वाटतंय की तो जेल बाहेर आल्यावर माझ्या कुटुंबाविरोधात काहीतरी गैरवर्तन करेल किंवा माझ्या मुलीला काहीतरी करुन बदला घेईल.” माहीने ट्वीट मध्ये लिहिलं होतं, “कुकने मला चाकू पोटात खुपसून मारण्याची धमकी दिली होती.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahhi vij claims her cook threatens to stab her says i am scared for my daughter dcp

Next Story
कंगना रणौतकडून नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जाहीर अभिनंदन, म्हणाली “रिक्षा चालवण्यापासून ते…”
फोटो गॅलरी