बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी नुकतीच स्तनाच्या कर्करोगातून ठीक झाली आहे. अनुपम खेर यांनी त्याच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये महिमाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती तिला स्तनाची कर्करोग झाल्यापासून ते त्यावर उपचार घेऊन ठीक होईपर्यंतचा सर्व अनुभव सांगताना दिसत आहे. जेव्हा महिमाला स्तनाच्या कर्करोगाचं निदान झालं त्यावेळी तिची मुलगी अरियानाची प्रतिक्रिया काय होती आणि ती या सर्व गोष्टींना कसं सामोरी गेली हे देखील महिमानं सांगितलं.

स्तनाच्या कर्करोगाचा अनुभव शेअर करताना महिमा म्हणाली, “आपल्या आईची देखभाल करता यावी म्हणून माझी मुलगी दोन महिने शाळेत गेली नाही. माझ्या मुलीने स्वतः येऊन मला सांगितलं की मी शाळेत जाणार नाही. कारण देशात अजूनही करोनाचे रुग्ण आहेत अशात तुझ्या आरोग्याच्या बाबतीत मला कोणतीही जोखीम घ्यायची नाही. त्यावेळी तिचे ऑफलाइन लेक्चर सुरू झाले होते. तिने घरी राहून ऑनलाइन क्लास अटेंड केले आणि यात तिच्या शाळेतूनही तिला पाठिंबा मिळाला होता.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

आणखी वाचा- “स्त्रियांनी शरीर दाखवलं तर…” ‘Aashram 3’ फेम ईशा गुप्ताचं बोल्ड विधान चर्चेत

दरम्यान स्तनाच्या कर्करोगबद्दल बोलताना महिमा चौधरी म्हणाली, “माझ्यात कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. मी दरवर्षी रुटीन चेकअप करते, ज्यामध्ये रक्त तपासणी, सोनोग्राफी सगळ्या टेस्ट केल्या जातात. माझी सोनोग्राफी करणार्‍या डॉक्टरांनी मला सांगितले की तुम्ही डॉक्टर मंदार जो ऑन्कोलॉजिस्ट आहे त्यांना भेटा. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी डॉक्टर मंदार यांना भेटले, तेव्हा ते म्हणाले की हे प्री-कॅन्सर सेल्स आहेत, ज्यांना DCIS म्हणतात. काहीवेळा ते कर्करोगाचे रूप धारण करतात आणि काहीवेळा घेत नाहीत. यासाठी बायॉप्सी करू, बाकी अजून काही दिसत नाही.”

पुढे महिमा म्हणाली, “डॉक्टरांनी पुन्हा मला सांगितले की या पेशी काढायच्या आहेत की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. मी लगेच म्हणाले, कृपया लगेच काढा. त्यामुळे माझी बायोप्सी केली आणि त्यात कर्करोग निघाला नाही, पण तरीही मला ते सेल्स काढून टाकायचे होते. जेव्हा त्यांनी त्या पेशी बाहेर काढल्या आणि त्यांची बायोप्सी केली तेव्हा त्यांना दिसले की एका बाजूला कर्करोग झाला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, जेव्हा तुमची शस्त्रक्रिया होत होती, तेव्हा आम्ही मानेमध्ये एक पोर्ट टाकला आहे आणि आम्हाला केमोथेरपी द्यावी लागेल. मी रडायला लागले. मी हे माझ्या आई-वडिलांना सांगितले नाही कारण कर्करोगाचे नाव ऐकताच लोक घाबरतात.”

आणखी वाचा- “तर मग शो बंद करा…” ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांवर भडकले चाहते

महिमाने १९९७ मध्ये शाहरुख खानच्या ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर २०१६ पासून महिमा अभिनयापासून लांब झाली. २०१६ मधला ‘डार्क चॉकलेट’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. आता ती अनुपम यांच्या ‘द सिग्नेचर’ या चित्रपटात दिसणार आहे.

Story img Loader