scorecardresearch

आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीला डेट करतोय हा स्टार किड

ती इमरान हाश्मीसोबतही झळकली होती.

abhimanyu dassani, sonal chauhan, bhagyashree
अभिमन्यू दसानी, सोनल चौहान, भाग्यश्री

‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळालेल्या अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा सध्या खूप चर्चेत आहे. तिचा मुलगा अभिमन्यू दासानी याचे अद्याप सिनेसृष्ट्रीत पदार्पण व्हायचे आहे आणि त्याआधीच तो चर्चेत आला आहे. एका वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अभिमन्यू आणि अभिनेत्री सोनल चौहान यांना अनेक ठिकाणी एकत्र फिरताना पाहिलं गेलंय. गेल्या वर्षभरापासून दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. याच वर्षी त्याने आपला २५ वा वाढदिवस सोनल आणि काही जवळच्या मित्रांसोबत साजरा केला. याशिवाय जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टमध्येही दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं.

‘जन्नत’ चित्रपटात इमरान हाश्मीसोबत सोनल चौहानने भूमिका साकारली होती. त्यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता. सध्या बॉलिवूड चित्रपटांपासून दूर गेलेली सोनल दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपले नशिब आजमावत आहे. १६ मे १९८७ रोजी मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) येथे जन्मलेली सोनल ३० वर्षांची आहे. तर अभिमन्यू २५ वर्षांचा आहे. या दोघांच्या वयात ५ वर्षांचे अंतर आहे.

bhagyashree

जाणून घ्या कोण आहे ‘ट्युबलाइट’मधील चीनी अभिनेत्री झू झू ?

दुसरीकडे अभिमन्यू बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. काही चित्रपटांसाठी त्याला विचारण्यात देखील आल्याची चर्चा आहे. ‘मर्द को दर्द नही होता’ या अॅक्शन कॉमेडी चित्रपटातून अभिमन्यू सिनेसृष्ट्रीत पदार्पण करणार आहे. हा चित्रपट अनुराग कश्यपच्या होम प्रॉडक्शनचा असून अनुरागचे असिस्टंट वासन बाला याचे दिग्दर्शन करणार आहेत. वासन ‘देव डी’ पासून अनुरागसोबत काम करत आहेत. या चित्रपटात अभिमन्यू मुख्य भूमिका साकारत असून राधिका मदान ही अभिनेत्रीसुद्धा यामध्ये झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maine pyar kiya fame bhagyashree son abhimanyu dassani dating sonal chauhan

ताज्या बातम्या