‘माझा होशील ना’ फेम अभिनेत्रीला प्रसिद्ध मंदिरात नाकारला प्रवेश

अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सांगितली संपूर्ण घटना.

mugdha puranik, manas mandir kalayan,
अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सांगितली संपूर्ण घटना.

छोट्या पडद्यावरील माझा होशील ना ही मालिको लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. मालिकेमधील प्रेत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेत सईच्या मैत्रिणीची म्हणजे नयनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुग्धा पुराणिक सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच मुग्धाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओतून तिला एका मंदिरात प्रवेश न दिल्याचे तिने सांगितले आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. मुग्धा ७ नोव्हेंबर रोजी कल्याण परिसरातील प्रसिद्ध मानस मंदिरात गेली होती. ही एक जैन मंदिर आहे. सुरुवातीला तिला आणि तिच्या काही मैत्रिणींना त्यालोकांनी एक ओढणी दिली. मात्र, रांगेत असताना जैन धर्माचे काही लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांनी तिला सांगितलं की तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही. याचे कारण मुग्धाने त्यांना विचारता ते म्हणाले, तुम्ही जैन धर्मीय नाहीत असं सांगितलं. याच कारणामुळे तुम्हाला मंदिरात प्रवेश मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा : क्रांती रेडकर राहत असलेल आलिशान घर आतुन पाहिलत का?

आणखी वाचा : “आपण हिंदू की मुस्लीम?” आर्यन, सुहानाच्या प्रश्नावर शाहरुखने दिले होते ‘हे’ उत्त

या व्हिडीओत मुग्धा म्हणाली, “हिंदू धर्मियांच्या मंदिरात सर्वांना प्रवेश दिला जातो. मी स्वतः जात​, ​धर्म ह्या गोष्टीमध्ये भेद करत नाही. त्यामुळे मी काल जैन मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मात्र आम्हाला त्याठिकाणी केवळ जैन धर्मीय नसल्याने प्रवेश मिळणार नाही असे सांगितले. आपल्या हिंदू​ मंदिरात सर्वांना विनामूल्य कुठलेही पैसे न घेता दर्शन दिले जाते. मात्र कालचा अनुभव माझ्यासाठी खूपच वाईट होता. मंदिरात गेल्यावर सुरुवातीला​ आम्हाला ओढणी देण्यात आली ती आम्ही घेऊन रांगेत उभे राहिलो होतो पण जैन धर्मीय नसल्याने आम्हाला दर्शन घेण्यास मनाई केली गेली. आता यावर कोणीतरी काही तरी कारवाई केली पाहिजे”, असे मुग्धा म्हणाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Majha hoshil na actress mugdha puranik stoped at famour manas temple in kalayan because she is not jain shares video dcp

ताज्या बातम्या