सध्या अभिनेते किरण माने हे चर्चेत आहेत. या चर्चा त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढण्यात आले. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आल्यामुळे सुरु झाल्या आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे काम गमवावे लागल्याचे त्यांनी समाजमाध्यमांवर जाहीर करत या घटनेचा निषेध केला. त्यानंतर अनेक कलाकारांनी त्यांना पाठिंबा दिला. दरम्यान, अभिनेत्री अनिता दातेने केलेली पोस्ट चर्चेत असते.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील अभिनेत्री अनिता दातेने किरण माने यांना पाठिंबा देत पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने, ‘एक अभिनेत्री म्हणून मी किरण माने यांच्या बाजूने आहे. कोणत्याही अभिनेत्याला / अभिनेत्रीला आगाऊ कल्पना न देता अथवा कोणतीही समज न देता अथवा कोणतेही कारण न देता कामावरून बाजूला करणे हे चुकीचे आहे. अशा निर्मिती संस्था आणि चॅनेल यांनी त्या कलाकाराला कामा वरून काढण्याचे योग्य कारण देण्याचे सौजन्य दाखवले पाहिजे. अशा व्यवस्थांचा मी निषेध करते’ असे म्हटले आहे.
आणखी वाचा : मालिकेतून काढल्यानंतर किरण माने घेणार शरद पवारांची भेट? चर्चांना उधाण

kiran mane shares post about propaganda films
“छुपा मुस्लीमद्वेष परसवणाऱ्या प्रोपोगंडा चित्रपटांमध्ये…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत, घेतला महत्त्वाचा निर्णय
Raja Ranichi Ga Jodi fame actor Sanket Khedkar new serial Jai Jai ShaniDev coming soon
Video: ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्याची येतेय नवी मालिका; शनिदेवावर आहे आधारित, पाहा जबरदस्त प्रोमो
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम

पुढे ती पोस्टमध्ये म्हणाली, ‘व्यवस्था समजून घेणे ,व्यवस्थेला प्रश्न विचारणे ,आपली राजकीय भूमिका योग्य पद्धतीने मांडता येणे ही खरंतर चांगली गोष्ट आहे असच मी मानते. त्याबाबत किरण माने यांचे कौतुक आहे. एखादया व्यक्तीची पोस्ट समजून घेण्याऐवजी त्याची गळचेपी करणे हे चुकीचे आहे. आपली राजकीय भूमिका वेगळी असेल तर आपण त्या व्यक्तीशी वाद घालू शकतो, चर्चा करू शकतो… मात्र त्याचं तोंड बंद करणे, त्याला धमकावणे, त्याच्या व्यवसायावर, कामावर टाच आणणे हे समाज म्हणून आपण निर्बुद्ध व मागास असल्याचे लक्षण आहे.’

अनिता पूर्वी दिग्दर्शक समीर विद्वांसने पोस्ट शेअर करत किरण मानेंना पाठींबा दिला होता. कोणतीही राजकीय भुमिका घेणं/व्यक्त होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. घटनादत्त अधिकार आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे! किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरून त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे’ असे ट्वीट समीर विद्वांसने केले आहे.